का चालवायची इनडोअर सायकल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:12 PM2017-11-14T16:12:06+5:302017-11-14T16:12:45+5:30

आरोग्याच्या तक्रारी असलेल्यांची दुखणी होऊ शकतात दूर..

 Why to run indoor cycle? | का चालवायची इनडोअर सायकल?

का चालवायची इनडोअर सायकल?

ठळक मुद्देइनडोअर सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होऊ शकतो.वजन घटवायचं असेल तर त्यासाठीही एक उत्तम प्रकार म्हणून तुम्ही सायकलिंगकडे पाहू शकता.सायकलिंगमुळे वाढतो स्टॅमिना, एन्ड्युरन्स आणि ताकदही.

- मयूर पठाडे

कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी इनडोअर सायकलिंग हा अतिशय उत्तम प्रकार आहे. व्यायामासाठी, आरोग्यासाठी आणि संपूर्ण शरीराला उपयोगी ठरू शकणारा हा व्यायामप्रकार त्यामुळे आजकाल सारेच व्यायामतज्ञ प्रत्येकाला सुचवतात.
काय आहेत इनडोअर सायकलिंगचे फायदे?
मुळात या प्रकारच्या सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला वजन घटवायचं असेल तर त्यासाठीही एक उत्तम प्रकार म्हणून तुम्ही सायकलिंगकडे पाहू शकता.
सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो, तुमचा एन्ड्युरन्स वाढतो आणि ताकदही.
सायकलिंगमुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. तुमचे मसल्स स्ट्रॉँग होतात.
अनेकांना गुडघ्याचे आजार असतात किंवा रनिंग, जॉगिंग वगैरेमुळे गुडघेदुखी सुरू होते. त्यामुळे अनेकांचा व्यायामच बंद होतो आणि आरोग्याच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. ज्यांना गुडघेदुखी किंवा नितंबाचा त्रास आहे असे लोकही सहजपणे इनडोअर सायकलिंग करू शकतात.
आपल्या शरीराची पॉवर वाढवतानाच सडपातळ होण्यासाठी सायकलिंग हा उत्तम व्यायामप्रकार ठरू शकतो. आपले कोअर मसल्स त्यामुळे स्ट्रॉँग होतात, हृदयाची क्षमता वाढते. वेट लॉस, ब्लड प्रेशर तसेच डायबेटिस कंट्रोलमध्ये राहातं. रात्रीची झोप व्यवस्थित लागते. टेन्शन कमी होतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी नेहमीची सायकल वापरतो, ती प्रत्येकाला उपयुक्त असेलच असं नाही. मात्र ही सायकल लहानापासून मोठ्यांपर्यंत साºयांना अतिशय उपयोगी ठरू शकते. त्याची उंची कमी जास्त करता येते. सायकल चालवताना आपल्याला जेवढा रेझिस्टन्स पाहिजे तेवढा आपण सेट करू शकतो. आपली कंफर्ट लेवल पाहून आपण सायकलिंग करू शकतो. तेही एकाच ठिकाणी. शिवाय बºयाच इनडोअर सायकल्समध्ये तुमचा हार्ट रेट, आपीएम, किती सायकल चालवली गेली, किती कॅलरीज जळाल्या.. अशी सगळी माहिती आपल्या डोळ्यांसमोरच आपल्याला दिसत असते. अशी ही टेलरमेड सायकल साºयांच्याच आरोग्याला चार चॉँद लावू शकते.
मग करताय ना सुरुवात?

Web Title:  Why to run indoor cycle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.