तरुणांमध्ये वाढतोय सोशल फोबियाचा धोका; जाणून घ्या लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:44 PM2018-11-10T17:44:23+5:302018-11-10T17:45:14+5:30

सोशल फोबिया एक असा आजार आहे ज्याची लक्षणं चटकन लक्षातही येत नाहीत. सध्या तरूणांमध्ये या आजाराची लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

what are the signs and symptoms of social phobia | तरुणांमध्ये वाढतोय सोशल फोबियाचा धोका; जाणून घ्या लक्षणं!

तरुणांमध्ये वाढतोय सोशल फोबियाचा धोका; जाणून घ्या लक्षणं!

googlenewsNext

सोशल फोबिया एक असा आजार आहे ज्याची लक्षणं चटकन लक्षातही येत नाहीत. सध्या तरूणांमध्ये या आजाराची लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.  या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती लोकांपासून दूर पळतात, लोकांशी बोलायला घाबरतात, या व्यक्ती सर्वांसमोर येण्यास थोड्या लाजतात. त्यामुळे त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्सही कमी होतो. अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती स्वतःच आपली निंदा करू लागते. मनातल्या मनात विचारांनी गोंधळून जातात. या व्यक्ती फार तणावामध्ये वावरत असतात. लोकांना आणि समाजाला घाबरण्याच्या आणि त्यांच्यापासून दूर पळण्याच्या स्थितीला सोशल फोबिया म्हटलं जातं. 

काय आहे सोशल फोबिया?

सोशल फोबिया एक प्रकारचा सोशल एंग्जायची डिसऑर्डर आहे. यामध्येही दोन प्रकार आढळून येतात. पहिल्या प्रकारामध्ये या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला एका विशिष्ट परिस्थितीमध्येच अशा समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे अशा व्यक्ती लोकांच्या समूहापुढे किंवा स्टेजवर सर्वांसमोर येऊन बोलू शकत नाही. त्यांना प्रचंड भिती वाटते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये या व्यक्ती एखाद्या नवख्या व्यक्तींशी बोलायला घाबरतात आणि लगेच नर्वस होतात. 

सोशल फोबियाची लक्षणं :

- सोशल फोबियामुळे पीडित व्यक्तीचा आत्मसन्मान कमी होतो. त्यामुळे त्या व्यक्ती इतर व्यक्तींशी बोलू शकत नाहीत. जर प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा अपमान होण्याची भिती सतावत असेल तर तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे. 

- जर लोकांमध्ये राहून त्यांना भेटण्यापासून पळ काढत असाल तर तर तुम्हीही सोशल फोबिया या आजाराने ग्रस्त आहात. कारण अशा परिस्थितीत पीडित व्यक्तीला सर्वांपासून भिती वाटते. 

- ज्या व्यक्ती सोशल फोबियाने त्रस्त आहेत, त्यांना सतत घाम येणं, थरथरण्याची समस्या होते. जर एखाद्या लोकांच्या समुहापुढे या व्यक्ती बोलत असाल आणि सतत घाम येत असेल आणि थरथरत असाल तर समजून जा की तुम्हाला सोशल फोबिया आहे. 

Web Title: what are the signs and symptoms of social phobia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.