मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:14 PM2017-07-26T15:14:59+5:302017-07-26T18:35:44+5:30

पावसाळ्यांतले आजार होतील दूर. मात्र कुठल्याही परिस्थितीत मुलांना रोज १००० मिलिग्रॅमपेक्षा जास्त सी व्हिटॅमिन देऊ नका..

vitamin c to prevent monsoon infections | मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम

मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम

Next
ठळक मुद्देमुलांच्या आहारात रोज ५०० मिलिग्रॅम क जीवनसत्त्व हवेमात्र १००० मिलिग्रॅमपेक्षा ते कुठल्याही परिस्थितीत जास्त नको.रोगप्रतिकारक शक्ती वाढतेविविध आजारांना अटकाव

- मयूर पठाडे

पावसाळ्यात केव्हाही पाहा, डॉक्टरांचे, विशेषत: लहान मुलांच्या डॉक्टरांचे दवाखाने खचाखच भरलेले असतात आणि मुलंही विविध दुखण्यांनी त्रस्त असतात. सर्दी, खोकला, थंडी, ताप, संसर्गजन्य आजार..
पावसाळ्याच्या दिवसांतल्या गर्दीमुळे डॉकटरांचे खिसे भरले जात असले तरी लहान मुलांना मात्र त्यांच्या आजारांचा खूपच त्रास होतो. पावसाळ्याचा हा त्रास लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या माणसांनाही होतो.
अनेकदा आजार आपल्या शरीरात घर करतात, ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे क जीवनसत्त्व. रोज तुमच्या आहारात क जिवनसत्त्वाचा समावेश असलाच पाहिजे.
पण यासंदर्भातही काही नियम पाळले पाहिजेत. क जीवनसत्त्वांमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून खात सुटा क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असं नाही.
सी व्हिटॅमिन रोज खाणं गरजेचं आहे, कारण ते तुमच्या शरीरात तयार होत नाही. तुम्हाला ते बाहेरुनच मिळवावं लागतं.
मात्र यासंदर्भात डॉक्टरांनी आणि संशोधकांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे.


लहान मुलांच्या शरीरात आहारातून रोज ५०० मिलिग्रॅम सी व्हिटॅमिन गेलं पाहिजे. मात्र कुठल्याही परिस्थितीत ते १००० मिलिग्रॅमच्या पुढे जाता कामा नये. नाहीतर त्याचा विपरित परिणाम होऊन लेने के देने पड सकते है असा इशराही संशोधकांनी दिला आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत अनेक संसर्गजन्य आजार आपल्याला होतात. वातावरण दमट असताना स्किनच्या आजारांनीही अनेक जण त्रस्त झालेले असतात. हात, पाय, नखं.. इत्यादि ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स, बुरशीजन्य संसर्गही झालेले दिसतात.
या आजारांवर मात करायची, त्यांना रोखायचं तर त्यासाठी व्हिटॅमीन सीचा फार उपयोग होतो. या व्हिटॅमिनमुळे बॅक्टेरियांना केवळ रोखताच येत नाही, तर बºयाचदा त्यांचा नाशही होतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा आपल्या आहारात, विशेषत: मुलांच्या आहारात समावेश असलाच पाहिजे. त्याचा अतिरेक मात्र व्हायला नको.

Web Title: vitamin c to prevent monsoon infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.