पाळीव प्राण्यांसोबत केवळ १० मिनिटे वेळ घालवल्याने होतो 'हा' मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:08 AM2019-07-19T11:08:34+5:302019-07-19T11:14:34+5:30

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं कुणालाही आवडतं. याने अनेकांना आनंद मिळतो. या गोष्टीला आता रिसर्चमधूनही दुजोरा दिला गेला आहे.

Stress is eliminated by spending 10 minutes with the pets says study | पाळीव प्राण्यांसोबत केवळ १० मिनिटे वेळ घालवल्याने होतो 'हा' मोठा फायदा!

पाळीव प्राण्यांसोबत केवळ १० मिनिटे वेळ घालवल्याने होतो 'हा' मोठा फायदा!

Next

(Image Credit : OrissaPOST)

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणं कुणालाही आवडतं. याने अनेकांना आनंद मिळतो. या गोष्टीला आता रिसर्चमधूनही दुजोरा दिला गेला आहे. पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने महाविद्यालयीन तरूणांना केवळ मूडच चांगला होतो असं नाही तर त्यांचा स्ट्रेस कमी होतो. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास आणि परिक्षांमुळे तणावात येतात. यावरूनच वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला.

(Image Credit : Petish)

अनेक युनिव्हर्सिटींनी 'पेट युअर स्ट्रेस अवे' नावाने एक प्रोग्राम सुरू केला आहे. यात विद्यार्थी कुत्रे आणि मांजरांसोबत खेळू शकत होते. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमधील असोसिएट प्रोफेसर पेट्रीसिया पेंड्री यांनी त्यांना रिसर्चमध्ये काय आढळलं हे सांगितलं. ते म्हणाले की,  पाळीव प्राण्यांसोबत केवळ १० मिनिटे राहूनही आरोग्यात मोठा फरक पडू शकतो. रिसर्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पाळीव कुत्रे आणि मांजरींसोबत वेळ घालवला त्यांच्यात कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण कमी आढळलं. हा तणाव निर्माण करणारा एक मुख्य हार्मोन आहे.

मूड होतो चांगला

(Image Credit : 387 Vets)

या रिसर्चमध्ये २४९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. पहिल्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांना कुत्रे आणि मांजरींसोबत १० मिनिटे वेळ घालवण्यास सांगण्यात आले. तर दुसऱ्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांना पहिल्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांसोबत खेळताना बघा असे सांगण्यात आले.

तसेच तिसऱ्या ग्रुपला त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या फोटोंची स्लाइड दाखवण्यात आली आणि चौथ्या ग्रुपला केवळ वाट बघण्यास सांगण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या लाळिचे सॅम्पल घेण्यात आले. ज्यातून समोर आलं की, जे विद्यार्थी जनावरांसोबत वेळ घालवत होते, त्यांच्या कॉर्टिलोसचं प्रमाण फार कमी होतं. पेंड्रीने सांगितले की, अशाप्रकारे वेळ घालवल्याने स्ट्रेस हार्मोन कमी होऊन याचा मानसिक आरोग्याला फायदा मिळतो.

Web Title: Stress is eliminated by spending 10 minutes with the pets says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.