Steps to better sleep: रात्री नीट झोप लागत नाही, या सोप्या गोष्टी पाळा, गाढ झोपी जाल, दुसऱ्या दिवशी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:13 AM2024-03-29T09:13:08+5:302024-03-29T09:13:42+5:30

काही कारणे अशीही असतात जी तुम्हाला झोपताना त्रास देतात. यावर उपाय केला तर तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकता. 

Steps to better sleep: Not sleeping well at night, follow these simple things, you will sleep deeply, the next day... | Steps to better sleep: रात्री नीट झोप लागत नाही, या सोप्या गोष्टी पाळा, गाढ झोपी जाल, दुसऱ्या दिवशी...

Steps to better sleep: रात्री नीट झोप लागत नाही, या सोप्या गोष्टी पाळा, गाढ झोपी जाल, दुसऱ्या दिवशी...

अनेकांना रात्रीची नीट झोप लागत नाही, झोप होत नाही. मग पुढचा दिवस राग, चिडचिड आदी गोष्टींनी भरलेला व आळसावलेला जातो. कामाचा स्ट्रेस, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मोबाईल-टीव्ही, विचार आदी अनेक कारणे यामागे असतात. परंतु काही कारणे अशीही असतात जी तुम्हाला झोपताना त्रास देतात. यावर उपाय केला तर तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकता. 

नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या एका सर्व्हेनुसार जे लोक दररोज त्यांचा बिछाना साफ करतात त्यांना गाढ झोप लागण्याची शक्यता ही १९ टक्क्यांनी अधिक असते. तसेच या लोकांचे आरोग्यही चांगले राहते. अमेरिकेच्या सेंट लारेन्स विद्यापीठाला घाणेरड्या रुममध्ये झोपल्याने चिंतेत वाढ होते असे आढळले आहे. 

आणखी एक उपाय म्हणजे तुमच्या बेडवरील चादर, बेडसीट, उशीचे कव्हर आदी आठवड्यातून एकदा धुण्याची गरज आहे. तसेच बिछाना रोज साफ करावा जेणेकरून प्रसन्न वातावरण राहिल आणि झोप चांगली येईल. 

झोपताना मोबाईल पाहू नये, यामुळे ब्लू लाईट डोळ्यावर पडून डोक्यावरही ताण येतो. यामुळे झोप प्रभावित होते. झोपताना मोबाईलमध्ये डोके खुपसून बसल्याने झोपेवर परिणाम होतो. एकदा काही दिवस हा देखील प्रयोग करून पहा.

दिवसा झोपलात तर त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो. जर तुम्हाला दिवसा झोप येत असेल तर तासाच्या वर झोपू नका. जर रात्रीचे काम असेल तर काम करण्याच्या रात्रीपूर्वी एक दिवस पूर्ण तुम्हाला झोपून काढावा लागेल. रोज फिजिकल अॅक्टीव्हीटी केल्याने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. परंतु, झोपण्यापूर्वी तुम्ही जास्त जड व्यायाम करू नका. 

Web Title: Steps to better sleep: Not sleeping well at night, follow these simple things, you will sleep deeply, the next day...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.