फिटनेससाठीचं डेडिकेशन नव्हे, हे तर आॅब्सेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:17 PM2017-12-25T16:17:32+5:302017-12-25T16:18:12+5:30

‘अति’ केलं, तर शेवटी गोत्यातच याल..

 Not a fitness for a dad, it's an obsession! | फिटनेससाठीचं डेडिकेशन नव्हे, हे तर आॅब्सेशन!

फिटनेससाठीचं डेडिकेशन नव्हे, हे तर आॅब्सेशन!

googlenewsNext
ठळक मुद्देअति व्यायाम करणाºयांना अनेकदा अति खाण्याचीही सवय जडते. बºयाचदा हे खाणंही अपायकारक असू शकतं.अति व्यायाम करून हे लोक आपल्या शरीर-मनाचा ताणही सारखा वाढवत असतात. कारण मनाप्रमाणे व्यायाम झाला नाही, तर त्यांना त्याचं फारच टेन्शन येतं.अति व्यायाम करणाºयांच्या आयुष्याचा जवळपास प्रत्येक क्षण व्यायामाच्या विचारांनी नाहीतर कृतीनं व्यापलेला असतो. ते सातत्यानं त्याविषयीच बोलतात आणि करतातही.

- मयूर पठाडे

काहीच व्यायाम न करणं, व्यायामापासून कायम चार हात दूर राहाणं हे जसं घातक, तसंच अति व्ययाम करणंही घातकच. अनेकदा हा अति व्यायाम तर जास्त घातक ठरतो. तुमचं शरीर, मन सुदृढ होण्यापेक्षा तुम्ही शरीर-मनानं कमजोरच होता.
अति व्यायाम करणाºयांना आपण काय करतोय हेच अनेकदा नीट कळत नाही. पण बॉडी कमवायची तर त्यासाठी आपला आहारही जास्त असला पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं.
अति व्यायाम करणाºयांना अनेकदा अति खाण्याचीही सवय जडते. बºयाचदा हे खाणंही अपायकारक असू शकतं. कारण जे काही ते खातात, ते खरंच हेल्दी असेलच असं नाही आणि ज्या प्रकारच्या अन्नाची त्यांना गरज असते, त्याऐवजी ऐकीव माहितीवर इतर गोष्टीच ते भरमसाठ खाताना दिसतात. अर्थातच त्यांच्या शरीरात त्यामुळे अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात.
हळूहळू त्याची सवय होत जाते आणि अति खाण्यापासून स्वत:ला ते वाचवू शकत नाहीत, त्याचं समर्थनही ते करायला लागतात.
अति व्यायाम करून हे लोक आपल्या शरीर-मनाचा ताणही सारखा वाढवत असतात. कारण मनाप्रमाणे व्यायाम झाला नाही, तर त्यांना त्याचं फारच टेन्शन येतं.
अति व्यायाम करणाºयांच्या आयुष्याचा जवळपास प्रत्येक क्षण व्यायामाच्या विचारांनी नाहीतर कृतीनं व्यापलेला असतो. ते सातत्यानं त्याविषयीच बोलतात आणि करतातही.
खरंतर कोण ‘अति’ करतंय याचा काही नियम नाही, प्रत्येकासाठी ते परिमाण वेगवेगळं असतं, पण आपल्याला स्वत:लाच ते लक्षात आलं पाहिजे.
तुम्ही नियमितपणे व्यायाम करीत असालही, पण ते तुमचं डेडिकेशन नाही, तर स्वत:च ओढवून घेतलेला आत्मनाश आहे.
तुम्हीही जर असा अति व्यायाम करीत असाल, तर लक्षात घ्या, हे डेडिकेशन नाही, आॅब्सेशन आहे.

Web Title:  Not a fitness for a dad, it's an obsession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.