खरबूजाच्या बियांचे फायदे वाचाल तर कधी फेकणार नाही, दूर होतील अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:58 AM2024-03-29T09:58:54+5:302024-03-29T09:59:29+5:30

Melon Seeds Health Benefits : सामान्यपणे लोक खरबूज खाऊन त्यातील बीया फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं या बियांमध्ये मोठी औषधीय शक्ती असते.

Muskmelon Seeds Benefits for lungs, kidneys, heart and cancer prevention | खरबूजाच्या बियांचे फायदे वाचाल तर कधी फेकणार नाही, दूर होतील अनेक समस्या

खरबूजाच्या बियांचे फायदे वाचाल तर कधी फेकणार नाही, दूर होतील अनेक समस्या

Melon Seeds Health Benefits : उन्हाळ्यात लोक जसे कलिंगड खाण्याचा आनंद घेतात तसाच खरबूज खाण्याचाही घेतात. या दोन्ही फळांमध्ये पाणी भरपूर असतं आणि यांची टेस्टही गोड असते. या दिवसात खरबूज खाण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. सामान्यपणे लोक खरबूज खाऊन त्यातील बीया फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं या बियांमध्ये मोठी औषधीय शक्ती असते.

खरबूजाच्या बिया खाण्याचे फायदे

खरबूजाच्या बीया तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. आधी त्या पाण्याने चांगल्या धुवून घ्या. जेणेकरून त्यांचा चिकटपणा निघून जाईल. मग या बीया उन्हात वाळत घाला. त्यानंतर त्या सोलून तुम्ही खाऊ शकता. या बीया तुम्ही भाजूनही खाऊ शकता.

खरबूजाच्या बियांमधली पोषक तत्व

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन  सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अ‍ॅंटी कॅंसर, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, अ‍ॅंटी मायक्रोबियल, एनलजेसिक, अ‍ॅंटी इंफ्लामेटरी, अ‍ॅंटी अल्सर तत्वांमुळे खरबूज फायदेशीर मानलं जातं.

फुप्फुसांची सफाई

खरबूज हे melon फॅमिलीतील फळ आहे. जर्नल ऑफ फार्माकॉग्नोसी अ‍ॅंड फाइटोकेमिस्ट्रीवर प्रकाशित एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, मेलनच्या बियांनी ट्यूबरकुलोसिसचा उपचार केला जाऊ शकतो. टीबी झाल्यावर बॅक्टेरिया तुमच्या फुप्फुसात जमा होता आणि खोकला व कफ या समस्या होतात.

किडनीसाठी फायदेशीर

शोधात सांगण्यात आलं आहे की, या बीया ड्यूरेटिक्स आहेत. याचा अर्थ हा आहे की, याने शरीरात वाढणारी पाण्याची लेव्हल  कंट्रोल करता येते. ज्यानंतर किडनीला अधिक मेहनत करावी लागत नाही. किडनीवर प्रेशर वाढल्याने तुमचं आरोग्य बिघडू लागतं.

कॅन्सरचा धोका टळतो

कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. ज्यात कोशिका असामान्य पद्धतीने वाढू लागतात. शोधात सांगण्यात आलं आहे की, खरबूजाच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-कॅन्सर तत्व असतात जे सेल्सना हेल्दी ठेवतात. 

कलिंगडाच्या बीया खाण्याचे फायदे

बीया आरोग्यासाठी कशा फायदेशीर - कलिंगडाच्या बीया का खाव्यात असा एक सामान्य प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर वर आधी दिलं आहेच. या बीया तुम्ही अंकुरित करुन खाल्ल्यात तर याचे फायदे अधिक होतात. 1/8 कप कलिंगडाच्या बियांचं सेवन केल्याने तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन मिळतं. तसेच कलिंगडाच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचं प्रमाणही भरपूर असतं. त्यासोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी सुद्धा असतात. हे सर्वच घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. 

असं करा सेवन - औषधी गुण असलेल्या या बीया खाव्यात कशा असा प्रश्न अनेकांना पडतो. सामान्यपणे कलिंगडाच्या बियांचं सेवन तुम्ही सुविधा आणि इच्छेनुसार करु शकता. त्यासोबतच या बीया तुम्ही कलिंगडासह तशाच कच्च्या खाऊ शकता. तसेच या बीयांना अकुंरित करुन किंवा भाजूनही खाऊ शकता. हे कशाप्रकारेही तुमच्यासाठी फायदेशीर असतात. पण या बीया खाताना बारीक चाऊन चाऊन बारीक करुन खाव्यात नाही तर पचनाला जड जाऊ शकतात. 

Web Title: Muskmelon Seeds Benefits for lungs, kidneys, heart and cancer prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.