सोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 12:32 PM2018-08-20T12:32:13+5:302018-08-20T12:32:48+5:30

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, आठवड्यातील सर्वात कंटाळवाणा दिवस सोमवार नाहीये. चला जाणून घेऊ कोणता दिवस सर्वात जास्त कंटाळवाणा आहे. 

This is the most depressing day of the week | सोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस!

सोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस!

Next

(Image Credit : www.bustle.com)

विकेंडला मजा-मस्ती केल्यानंतर सोमवारची सकाळ ही अनेकांसाठी आनंददायी किंवा फ्रेश नसते. खासकरुन कार्पोरेट सेक्टरमधील लोकांना तुम्ही अनेकदा सहज बोलताना ऐकलं असेल की, सोमवार हा सगळ्यात कंटाळवाणा किंवा डिप्रेसिंग दिवस आहे. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, आठवड्यातील सर्वात कंटाळवाणा दिवस सोमवार नाहीये. चला जाणून घेऊ कोणता दिवस सर्वात जास्त कंटाळवाणा आहे. 

'हा' दिवस सर्वात डिप्रेसिंग

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस हा सोमवार नाही तर मंगळवार असतो. या दिवशी लोकांना सर्वात जास्त निराशा आणि बोरिंग जाणवतं. 

किती लोकांवर केला हा अभ्यास

या अभ्यासासाठी एका मोबाइल अॅपचा वापर करण्यात आला आणि दोन महिने यात सहभागी २२ हजार लोकांवर लक्ष ठेवण्यात आले. या अभ्यासात सहभागी लोकांना प्रत्येक दोन तासांनी मेसेज करुन हे विचारले जात होते की, ते आज कुठे आहेत? त्यांना आज कसं वाटतंय? काय करत आहेत आणि कुणासोबत आहेत?

काय निघाला निष्कर्ष?

या अभ्यासातील गोष्टींचं निरीक्षण केल्यावर असे समोर आले की, सोमवार नाही तर मंगळवार हा आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग, निराशाजनक दिवस आहे. अभ्यासक जॉर्ज मॅककेरॉन यांनी सांगितले की, अशी शक्यता नाकारता येत नाही की, काही लोकांचा विकेंड सोमवारी पूर्णपणे संपलेला नसतो आणि त्यामुळे मंगळवार येई पर्यंत लोकांमध्ये डिप्रेशन दिसतं. कारण पुढील विकेंड येण्यासाठी आणखी ३ दिवस वेळ लागणार असतो. 

हा आहे सर्वात चांगला दिवस

आठवड्यातील सर्वात चांगला किंवा आनंदी दिवस कोणता हे तुम्हाला माहीत आहे? नाही ना! तर आठवड्यातील सर्वात आनंदी दिवस शनिवार सांगितला गेला आहे. या अभ्यासात सहभागी जास्तीत जास्त लोकं शनिवारी चांगल्या मूडमध्ये दिसले आणि आनंदाचं हे वातावरण रविवारपर्यंत टिकून राहतं. 
 

Web Title: This is the most depressing day of the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.