'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाही मक्याचे चमकदार धागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:31 PM2019-02-11T12:31:14+5:302019-02-11T12:48:37+5:30

आपल्यापैकी अनेकजण मका आवडीने खातात. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्यांकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात.

Know the amazing health benefits corn silk | 'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाही मक्याचे चमकदार धागे!

'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाही मक्याचे चमकदार धागे!

googlenewsNext

(Image Credit : YouTube)

आपल्यापैकी अनेकजण मका आवडीने खातात. पण मका खाताना त्यातील चमकदार बारीक धाग्यांकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. मक्याच्या सालीसह हे धागेही कचरा म्हणून फेकले जातात. या मुलायम आणि चमकदार धाग्यांना कॉर्न सिल्क म्हटलं जातं. कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं.

(Image Credit : Steemit)

ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांच्या औषधांमध्येही याचा वापर केला जातो. ब्लेडरमध्ये इन्फेक्शन, यूरिनरी सिस्टीममध्ये सूज, किडनी स्टोन, डायबिटीज, जन्मापासून हृदयाची समस्या, हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणे असा समस्यांपासून सुटका मिळवण्याठी याचा वापर केला जातो. चला जाणून घेऊ कॉर्न सिल्कचे आरोग्यदायी आणखीही फायदे....

हाय ब्लड शुगर कमी करत

हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त लोकांसाठी मक्याचे हे धागे फायदेशीर आहेत. याने शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि शुगरचं प्रमाण कमी केलं जातं. 

व्हिटॅमिन सी

(Image Credit : pinterest.com)

जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत. हे एक चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि कार्डियोवस्कुलर रोगापासून याने बचाव होण्यास मदत मिळते. तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो. 

किडनीची समस्या दूर करा

(Image Credit : YouTube)

किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता. याने यूटीआय, ब्लेडर, इन्फेक्शन, किडनी स्टोन, यूरिनरी सिस्टममध्ये सूज येणे अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

डोकेदुखीपासून आराम

(Image Credit : Wesley Medical Center)

सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल तर तुम्ही कॉर्न सिल्क टी चं सेवन करू शकता. यात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी आणि ऐनलगेसिक गुण असतात. याने तुम्ही स्ट्रेस आणि टेन्शन फ्रि होऊ शकता. इतकेच नाही तर खांदेदुखी, मान दुखणे, जबडा अडकणे अशाही समस्या याने दूर होण्यात मदत मिळू शकते. 

पचनक्रिया राहते चांगली

(Image Credit : Better Nutrition)

कॉर्न सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया चांगली राहते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मक्याचे हे धागे लिवर द्वारे बाइल सेक्रेशनला वाढवतात. बाइल गालब्लेडरमध्ये एकत्र होतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होतं. 

वजन कमी करण्यास मदत

(Image Credit : Orbit Fitness)

कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. यापासून तयार चहा सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं आणि याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. 

त्वचेसंबंध समस्या होतात दूर

(Image Credit : The Frisky)

कॉर्न सिल्कने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. खरचटणे, पिंपल्स, खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो. यातील अ‍ॅंटीबॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी सेप्टीक गुण त्वचेची रक्षा करतात. 

कसा कराल कॉर्न सिल्कचा चहा

(Image Credit : Organic Facts)

मक्याचे धागे तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे उकडू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता. 

Web Title: Know the amazing health benefits corn silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.