मध आणि लसूण सोबत खाणं खरंच चांगलं असतं का? जाणून घ्या याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:07 AM2024-04-23T10:07:12+5:302024-04-23T10:08:11+5:30

लसूण जर मधात भिजवून खाल्ला तर याने शरीराला अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल सोबतच अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-फंगल गुणही मिळतात. 

Is it really good to eat with honey and garlic? Know the benefits | मध आणि लसूण सोबत खाणं खरंच चांगलं असतं का? जाणून घ्या याचे फायदे

मध आणि लसूण सोबत खाणं खरंच चांगलं असतं का? जाणून घ्या याचे फायदे

Healthy Foods: लसूण खाण्याचे आरोग्याला काय काय फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच डॉक्टर आहारात वेगवेगळ्या पद्धतीने लसणाचा समावेश करण्यास सांगतात. लसणांमध्ये अनेक औषध गुण असतात. लसणांमध्ये एलिसिन, सल्फर आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. तर मध हे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटने भरपूर असतं. सोबतच यात इन्फ्लेमेटरी गुणही असतात. अशात लसूण जर मधात भिजवून खाल्ला तर याने शरीराला अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल सोबतच अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-फंगल गुणही मिळतात. 

एखाद्या काचेच्या बरणींमध्ये लसूण सोलून टाका आणि त्यात मध टाका. आता ही बरणी बंद करून ठेवा. ही बरणी फ्रिज किंवा कपाटात ठेवण्याऐवजी रूमच्या तापमानात काही दिवस ठेवा आणि नंतर याचं सेवन करा. लसूण आणि मध सोबत खाण्याचे फायदे काय काय होतात हे जाणून घेऊ...

मध आणि लसूण सोबत खाण्याचे फायदे

1) लसूण मधात भिजवून ठेवा आणि रोज एक लसणाची कळी खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. अशाप्रकारे लसूण खाल्ल्याने ब्लड ब्लड प्रेशर कमी राहतं, कॉलेस्ट्रोल कमी होतं, ब्लड क्लोटिंगचा धोकाही कमी होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये काही अडथळा राहत नाही.

2) अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण भरपूर असल्याने मधासोबत लसूण खाल्ल्याने खोकला, सर्दी आणि वातावरणाच्या बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर राहतात. लसणाने बॅक्टेरिया नष्ट होतात ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

3) बॅक्टेरिया फूड पॉयझनिंगची समस्या वाढवतात. अशात पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी आणि फूड पॉयझनिंगसारखी समस्या दूर ठेवण्यासाठी मध आणि लसूण सोबत खाल्ल्याने मदत मिळते. 

4) स्मरणशक्ती आणि मेंदुचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लसूण आणि मध सोबत खाल्ल्याने फायदा मिळतो. याने मेंदुचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. 

5) अशाप्रकारे लसणाचं सेवन केल्याने शरीराची रोज प्रतिकारक क्षमता वाढते. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो.

6) शरीरावर होणारी एलर्जी, रॅशेज आणि एक्नेची समस्या दूर करण्यासाठी मध असलेला लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Is it really good to eat with honey and garlic? Know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.