‘ड’ चा ‘द’ झाला तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:56 AM2017-11-23T05:56:03+5:302017-11-23T05:56:21+5:30

मधुमेहाचे दोन प्रकार सगळ्यांना ठाऊक असतात. टाइप १ आणि टाइप २.

If 'd' is 'd' then | ‘ड’ चा ‘द’ झाला तर

‘ड’ चा ‘द’ झाला तर

Next

- डॉ. नितीन पाटणकर, मधुमेहतज्ज्ञ
मधुमेहाचे दोन प्रकार सगळ्यांना ठाऊक असतात. टाइप १ आणि टाइप २. या शिवाय गरोरदरपणात होणारा मधुमेह, लाडा, मोडी असे अनेक प्रकार आहेत. हल्ली ‘सोशलमीडिया’ या नावाचे आधुनिक कुरु क्षेत्र तयार झाले आहे. तिथे जर मी मोडी नावाचा मधुमेहाचा प्रकार आहे असे लिहिले तर काय होईल? मोडी हा कोणी मॉडी असाही उच्चारतात. टडऊ म्हणजे मॅच्युरिटी आॅनसेट डायबेटीस (आॅफ) यंग या शब्दांचे लघुनाम आहे.
आपला देश हा विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला आहे. (शाळेनंतर हे वाक्य फार वर्षाने ते लिहून एकदम ‘गेले ते दिवस’ असे म्हणावेसे वाटले). त्यामुळे आपल्या देशांची विविधता अनेक ठिकाणी दिसते. कुठल्याही शब्दाचा उच्चार या विविधतेने नटलेला असतो. माझे एक स्नेही आहेत, कुमार देशपांडे नावाचे. त्यांचा अनुभव. मद्रासला गेले होते. हॉटेल सम्राटमध्ये जायचे होते. बºयाच टॅक्सीवाल्यांना विचारले की ‘हॉटेल सम्राट’ चलोगे क्या? पण कोणालाच हे सम्राट प्रकरण कळेना. शेवटी त्यांनी कागदावर इंग्रजीत लिहिले तेव्हा अनेक टॅक्सीवाल्यांच्या तोंडून ‘हॉटेल सॅमरॅट’ असे उद्गार निघाले. ज्या टॅक्सीत बसले त्या टॅक्सीवाल्याने त्यांना सुनावले ‘वॉट ब्यॅड स्पिकिंग स्टाइल सार’. हे झालं उच्चाराच्या बाबतीत. उच्चारांचे जेव्हा लिखाण होते तेव्हा अजून विविधता येते.
तर मी मोडी किंवा मॉडी असा मधुमेहाचा प्रकार आहे असे लिहिले, की पुढे त्याचे मोदी व्हायला वेळ लागणार नाही. मग व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर पोस्ट यायला लागतील. ‘अमेरिकेमधे शास्त्रज्ञांनी मधुमेहाचा नवीन प्रकार शोधून काढला. त्याचे नाव आहे मोडी’. मग ‘या डायबेटीस बद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर मोडी येणे आवश्यक’ अशा पोस्ट फिरावयास लागतील. मग ‘मोडी नावाचा डायबेटीस टाळण्यासाठी काय करावे’ असे शीर्षक देऊन नांगरे पाटील, नाना पाटेकर, सद्गुरू, बिल गेट्स, गांधी यांच्या नावाने अनेक पोस्ट फिरतील. हे करताना कधीतरी ‘मोडी’ चा मोदी होईल. पेशवाईत ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने जे झाले त्या पेक्षा ‘भारी’ काहीतरी होईल.
माझा एक सर्जन मित्र म्हणतो, ‘जगात फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत, सर्जन आणि नॉन सर्जन’. तसेच सोशल मीडियावर दोनच प्रकारचे लोक दिसतात. एका बाजूने बातमी आली की ‘जागतिक मधुमेह संघटनेने केला मोदींचा गौरव. त्यांचे नाव नुकत्याच शोध लागलेल्या मधुमेहाच्या नवीन प्रकाराला देण्यात आले आहे’. की लगेच विरु द्ध बाजूने तोफा डागल्या जातील, ‘व्यक्तिकेंद्रितपणा आणि नारसिसिझमचा अतिरेक. विविध शासकीय योजनांना पूर्वी जशी राजकीय नावे दिली जात तसे करता येत नसल्याने आता रोगाला आपले नाव देण्याचा अश्लाघ्य प्रकार उघडकीस.
एवढे झाले की मग सुरू होते सोशल मीडियावरील मॅच. यालाच व्हायब्रंट सोशल मीडिया म्हणतात. तुम्ही पण बघा कुठे ‘ड’ चा ‘द’ करता येतो आहे का... १िस्रं३ंल्ल‘ं१ल्ल्र३्रल्ल@ॅें्र’.ूङ्मे

Web Title: If 'd' is 'd' then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई