Fitness : ​‘सौगंध’ ते ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ पर्यंत २६ वर्षाचा प्रवास करणाऱ्या अक्षय कुमारचे हे आहे फिटनेस रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 08:39 AM2017-08-17T08:39:11+5:302017-08-17T14:09:11+5:30

अक्षयच्या या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या फिटनेसमुळेच यशस्वी ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. जाणून घ्या अक्षयच्या हेल्थ टिप्स...

Fitness: Akshay Kumar, who has traveled 26 years till 'Saugandh' to 'Toilet Ek Prematha', is the fitness secret! | Fitness : ​‘सौगंध’ ते ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ पर्यंत २६ वर्षाचा प्रवास करणाऱ्या अक्षय कुमारचे हे आहे फिटनेस रहस्य !

Fitness : ​‘सौगंध’ ते ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ पर्यंत २६ वर्षाचा प्रवास करणाऱ्या अक्षय कुमारचे हे आहे फिटनेस रहस्य !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
अक्षय कुमारने १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात अक्षयची शरीरयष्टी सडपातळ आणि केस मोठे होते. त्या काळात मोठ्या केसांची जणू क्रेझच होती. मात्र जसजसा अक्षयचा चित्रपट प्रवास पुढे सरकत राहिला तसा त्याचा लूकदेखली बदलत गेला. आज अक्षय कुमारला बॉलिवूडचा सर्वात फिट अ‍ॅक्टर मानले जाते. अक्षयचा नुकताच 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. 
अक्षयच्या या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या फिटनेसमुळेच यशस्वी ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अक्षय आपल्या फिटनेससाठी खूपच काळजी घेत असल्याचे दिसून येते. त्यासाठी तो अनेक प्लॅनदेखील फॉलो करतो आणि आपल्या चाहत्यांनाही आरोग्यासंबंधी टिप्स सांगत असतो.  

* जाणून घ्या अक्षयच्या हेल्थ टिप्स
- अक्षय नियमित अर्धा तास वॉक, जिम, योगा किंवा डान्स करतो. शिवाय तो लिफ्ट ऐवजी पायºयांचा वापर करतो. 
- तो आपल्या आहारात गोड पदार्थ आणि मिठाचा वापर कमी करतो. 
- त्याच्या आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थांचा समावेश नसतो.
- त्याच्या डायटमध्ये इतर पदार्थांपेक्षा हिरव्या भाज्या आणि सलादचा समावेश जास्त असतो. 
- आरोग्य चागंले राहावे म्हणून अक्षय रोज पहाटे ४.३० वाजता उठतो.
- फिटनेससाठी तो रोज सकाळी किमान एक तास स्विमिंग करतो. शिवाय एक तास मार्शल आर्टदेखील करतो. 
- नियमित योगा आणि स्ट्रेचिंग एक्झरसाइजही करतो. 
- दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नियमित एक तास मेडिटेशन करतो.
- त्याच्या नाश्त्यामध्ये पराठे आणि एक ग्लास दूधाचा समावेश असतो. 
- दुपारच्या जेवणात चपाती, डाळ, हिरवा भाजीपाला, चिकन आणि एक वाटी दहीचा समावेश असतो. 
- रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप, सलाद आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. 

Also Read : ​टॉयलेट: एक प्रेमकथा

Web Title: Fitness: Akshay Kumar, who has traveled 26 years till 'Saugandh' to 'Toilet Ek Prematha', is the fitness secret!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.