उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 11:23 AM2019-03-09T11:23:57+5:302019-03-09T11:28:09+5:30

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत.

Does the risk of infertility increase by late marriage? | उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

Next

(Image Credit : HealthyWomen)

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत. याचं कारण तरूणांमध्ये वाढती इनफर्टिलिटीची समस्या. कधी कधी तर ही समस्या इतकी वाढते की, लोकांना पत्ताही लागत नाही. तसेच एक सामान्य धारणा अशीही आहे की, वय जास्त झाल्यावर लग्न केल्यास इनफर्टिलिटीचा धोका अधिक वाढतो. चला जाणून घेऊ याबाबत आणखी माहिती.

हैराण करणारी आकडेवारी

thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळ होण्यास अडचण येण्याची समस्या म्हणजेच इन्फ्रर्टिलिटीची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये फार वाढली आहे. एका सर्व्हेनुसार, भारतात जवळपास २ कोटी ७५ लाखांपेक्षा अधिक कपल्स इन्फर्टिलिटीचे शिकार आहेत. म्हणजे दर १० पैकी १ कपल लग्नानंतर बाळा जन्म देण्यात सक्षम नाहीये. याबाबत लोकांमध्ये अनेक चुकीच्या धारणा असतात. पण तज्ज्ञ मानतात की, जास्तीत जास्त लोकांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या ही त्यांच्या चुकीच्या सवयींमुळे येते.

जास्त वयात लग्न करणे

आजकालची तरूणी पिढी करिअर सेट झाल्यावर आणि आर्थिक रूपाने सक्षम झाल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतात. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त तरूण-तरूणी ३० ते ३२ वयादरम्यान लग्न करू इच्छितात. तसेच लग्नानंतरही काही वर्ष त्यांना मुल होऊ द्यायचं नसतं. तज्ज्ञ यावर सांगतात की, ३५ वयानंतर महिलांना आई होण्यासाठी सामान्यांपेक्षा अधिक अडचणी येतात. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये नॉर्मल डिलीव्हरीऐवजी ऑपरेशन करावं लागतं. अनेक जोडप्यांमध्ये शुक्राणूंची क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे त्यांना अडचणी येतात.
दुसरं कारण जे आजकाल जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये पाहिले जातात ते म्हणजे फायब्रायड तयार होणं, एन्डोमॅट्रियमशी संबंधित समस्या. वाढत्या वयात हायपरटेंशनसारख्य दुसऱ्या समस्याही होतात आणि याकारणाने महिलांची फर्टिलिटी प्रभावित होते, असे सांगितले जाते. 

स्पर्म क्वॉलिटी

आजकाल कमी वयात सिगारेट, मद्यसेवन, गुटखा आणि वेगवेगळे ड्रग्स पदार्थ सेवन करण्याची सवय काही तरूण-तरूणींमध्ये वाढली आहे. या सवयींमुळे वीर्याची गुणवत्ता खराब होऊ लागते आणि स्पर्म काउंट कमी होतं. याने होणाऱ्या बाळावर आनुवांशिक रूपाने बदलही होऊ शकतात. याचप्रमाणे अल्कोहोल सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं उत्पादनही कमी होतं. 

कामाचा वाढता ताण

आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रात काम आणि यशाचं दबाव आधीपेक्षा अधिक वाढला आहे. याकारणाने लोकांना ओव्हर टाइम, नाइट शिफ्ट किंवा घरी काम करावं लागतं. कामासोबतच शरीरासाठी आरामही गरजेचा आहे. पण त्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाहीये. लोक एक्सरसाइजही करत नाही आणि खाण्या-पिण्याकडेही त्यांचं लक्ष नसतं. याने हळूहळू व्यक्तीच्या स्पर्मची क्वॉलिटी खराब होते असं सांगितलं जातं. 

(टिप : वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. केवळ माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या माहितीकडे उपाय किंवा उपचार म्हणून बघू नका. तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Does the risk of infertility increase by late marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.