पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागते का?; यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 04:14 PM2019-03-29T16:14:06+5:302019-03-29T16:16:30+5:30

उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक असतं. यामुळे सन स्ट्रोक, डिहायड्रेशन इत्यादी समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

Do you feel excessive thirst know what is the reason | पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागते का?; यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं!

पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागते का?; यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं!

Next

(Image Credit : Verywell Family)

उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक असतं. यामुळे सन स्ट्रोक, डिहायड्रेशन इत्यादी समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. पण काही लोकांना हिवाळा असो किंवा उन्हाळा लगेच तहान लागते. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही लगेच तहान लागत असेल, तर त्यामागे अनेक वेगवेगळी कारणं असतात. साधारणतः तहान तेव्हाच लागते जेव्हा शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी होते. पण इतर अनेक कारणांमुळे लगेच तहान लागू शकते. जाणून घेऊया सतत तहान लागण्याच्या काही कारणांबाबत...

मीठ अधिक खाणं

काही लोक खाण्यामध्ये मीठ खाणं पसंत करतात. अनेकदा अशा व्यक्ती वर पदार्थामध्ये मीठ असतानाही वरून मीठ टाकून घेतात. मीठ तहान वाढवतं. यामागील कारणं म्हणजे, मीठ पेशींमधून पाणी बाहेर काढून टाकतं. अशातच तुम्ही जास्त मीठ खात असाल तर पेशींमधून पाणी बाहेर निघून जातं. त्यामुळे एका दिवसात 4 ते 5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचे सेवन करू नका. अधिक मीठ खाल्याने हाय ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन यांसारख्या समस्या होऊ शकतात. 

डायबिटीज तर नाही?

डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये जास्त तहान लागणं याचाही समावेश होतो. साधारणतः डायबिटीज किंवा प्रीडायबिटीजमध्ये जास्त तहान लागणयासोबत जास्त लघवीला होणं आणि धुसर दिसणं यांसारख्या समस्यांचाही समावेश असतो. 

धावल्यानेही लागते तहान 

सकाळी धावल्यानेही तहान लागते. धावल्यामुळे शरीराला जास्त पाण्याची गरज असते. धावताना शरीरातील बरचंसं पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर टाकण्यात येतं. ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते. जर तुम्ही दररोज धावत असाल तर दिवसभर खूप तहान लागू शकते. 

औषधांचं सेवन 

अनेकदा जास्त औषधाचं सेवन तहान लागण्याचं कारण ठरतं. काही औषधांचं सेवनाने तोंड कोरडं पडतं. अ‍ॅन्टीकॉलिनर्जिक्स आणि ड्यूरेटिक्स अशी औषधं आहेत, ज्यांच्या सेवनाने जास्त तहान लागते. 

ड्राय माउथ

ड्राई माउथ म्हणजेचं तोंड कोरडं होण्याच्या समस्येला 'जेरोस्टोमिया' असं म्हणतात. ही एक प्रकारची आरोग्याशी निगडीत समस्या असतात. ज्यामध्ये स्लॅवरी ग्लँडस पुरेशा प्रमाणात लाळ तयार करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी तहान लागते. पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडं राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नसून कोणताही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. 

Web Title: Do you feel excessive thirst know what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.