मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 10:42 AM2018-12-26T10:42:38+5:302018-12-26T10:42:53+5:30

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ तापमान कमी झाल्याने किंवा जास्त थंड झाल्याने तुमचं नाक थंड होत असेल तर तुम्ही चुकताय.

A cold nose could mean your brain is working too hard | मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

Next

(Image Credit : MediaFamily.org)

अनेकदा अचानक नाक थंड झाल्याचं तुम्ही अनुभवलं असेल. अनेकांना असं का होतं? असा प्रश्नही पडत असेल. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ तापमान कमी झाल्याने किंवा जास्त थंड झाल्याने तुमचं नाक थंड होत असेल तर तुम्ही चुकताय. ही बाब नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चनुसार, तुमचा मेंदू किती मेहनतीने काम करतो यावर तुमच्या नाकाचं तापमान अवलंबून असतं.

यूनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या संशोधकांनी हा रिसर्च केला. यासाठी त्यांनी १४ वॉलेंटिअर्सच्या न्यूरॉलॉजिकल फंक्शन्सची तपासणी केली. यातून त्यांना आढळलं की, जे व्यक्ती मानसिक रुपाने जितके जास्त सक्रिय असतात त्यांचं नाक तितकंच जास्त थंड असतं. 

या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मेंदूची तपासणी करण्यासाठी संशोधकांनी थर्मल इमेजिंग कॅमेराचा वापर केला. जेव्हा या सहभागी व्यक्तींना वेगवेगळे बौद्धिक कामे करण्यास सांगण्यात आलीत, तेव्हा त्यांच्या नाकाचं तापमान मोजलं गेलं आणि त्यातून समोर आलं की, या दोन्हींमध्ये खोलवर संबंध आहे. म्हणजे जेव्हा मेंदू जास्त मेहनत करता तेव्हा नाकाचं तापमान कमी झालेलं बघायला मिळतं. याचं कारण मेंदूला प्रेशरमध्ये काम करताना जास्त वेळ काम करण्यासाठी रक्ताचा प्रवाह चेहऱ्याच्या न्यूरॉन्सकडे डायव्हर्ट करायचं असतं. 

नाकाचं तापमान आणि मेंदू यांचा संबंध जाणून घेण्यासाठी करण्यात आलेला हा रिसर्च ह्यूमन फॅक्टर्स नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चचे लेखक एअरबससोबत मिळून प्लेनच्या कॉकपिटमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरा लावून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, जेव्हा पायलट खूप जास्त हस्तक्षेप असताना किंवा नसताना फ्लाइट उडवतात तेव्हा त्यांचं मेंटल प्रेशर किती असतं. आणि याचा त्यांच्या नाकाच्या तापमानावर काय प्रभाव पडतो?

Web Title: A cold nose could mean your brain is working too hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.