किती व्यायाम केल्याने अल्झायमरची समस्या दूर होते? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:01 AM2018-09-27T10:01:11+5:302018-09-27T10:02:14+5:30

प्रत्येक आठवड्यात कमीत कमी अडीच तास व्यायाम केल्यास लोकांमध्ये स्मरणशक्तीची समस्या निर्माण होणे फार काळ रोखले जाऊ शकतं.

Cause, symptoms of Alzheimers disease and how to prevent Alzheimer | किती व्यायाम केल्याने अल्झायमरची समस्या दूर होते? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

किती व्यायाम केल्याने अल्झायमरची समस्या दूर होते? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

Next

प्रत्येक आठवड्यात कमीत कमी अडीच तास व्यायाम केल्यास लोकांमध्ये स्मरणशक्तीची समस्या निर्माण होणे फार काळ रोखली जाऊ शकते. ज्यांच्या डीएनएमध्ये काही समस्या असते त्यांना अल्झायमरचा धोका राहतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. जर्मनीच्या यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ टबीनगेनमधील अभ्यासकांनी सांगितले की, ऑटोसोमल डॉमिनन्ट अल्झायमर डिजीज एका दुर्लभ अनुवांशिक आजार आहे. ज्यात कमी वयातच स्मरणशक्तीची समस्या निर्माण होते.

हा रिपोर्ट अल्झायमर अॅन्ड डिमेंशिया जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये स्मरणशक्ती आणि शारीरिक हालचाली यात महत्त्वपूर्ण संबंध दाखवला गेला आहे. हा संबंध एडीएडी म्हणजेच ऑटोसोमल डॉमिनन्ट अल्झायमर डिजीज असलेल्या लोकांमध्ये दिसतो.

अल्झायमर आजार होण्याची कारणे

अल्झायमर हा आजार होण्याची ठोस कारण स्पष्ट नाही. पण काही निदानानुसार, मेंदु आकुंचन पावतो. याने स्मरणशक्ती कमी होते. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी जीवनशैलीमध्ये परिवर्तन होऊ लागतं. डोक्यातील पेशींच्या चारही बाजूंनी एमीलोइड प्लेक नावाचं एक प्रोटीन दिसू लागतं. डोक्यातील पेशींच्या आत टाऊ नावाच्या दुसऱ्या प्रोटीनच्या एकत्र येण्याने गाठी होऊ लागतात. अल्झायमरने ग्रस्त लोकांच्या डोक्यात एक न्यूरोट्रान्समीटर एसिटायलॉक्लिनचा स्तर कमी होऊ लागतो.

अल्झायमरची लक्षणे

१) स्मरणशक्ती कमी होणे

नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होणे या सामान्य बाबी असतात. या आजाराने तुमची पूर्ण स्मरणशक्ती पुसली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्ही कुणालाही ओळखू शकणार नाहीत. 

२) कोणत्याही गोष्टीचा निर्णय न घेऊ शकणे

हा आजार झाला असेल तर तुमची निर्णय क्षमता कमी होते. पर्यायांमधून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात. 

३) शारीरिक ताळमेळ बसवण्यात समस्या

शरीरावर नियंत्रण न राहिल्याने तुम्ही पडूही शकता किंवा जेवण तयार करणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करतांना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. आजार जास्तच वाढला असेल तर तुम्ही रोजची कामे जसे की, आंघोळ करणे, कपडे परिधान करणे, तयार होणे, जेवण करणे, टॉयलेटला जाणे यांसारखी कामे कुणाच्याही मदतीशिवाय करु शकणार नाहीत.  

४) अंकांची ओळख न होऊ शकणे

या आजारामुळे तुम्हाला अक्षरांची किंवा अंकांची ओळख करण्यास त्रास होऊ शकतो आणि हिशोब करण्यासही समस्या येऊ शकते. 

५) वेळ, तारीख आणि ठिकाण विसरणे

या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला वेळ, तारीख आणि दिवस तसेच ओळखीची ठिकाणेही लक्षात राहत नाहीत. तुम्ही तुमच्या घराचा पत्ताही विसरु शकता. तुम्ही काय काम करता हेही विसरु शकता. 

६) बोलण्यात अडचण

हा आजार तुम्हाला झाला असेल तर तुम्ही एकही भाषा नीट बोलू शकणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटतं ते शब्दात व्यक्त न करता येणे किंवा लिखित अक्षरे समजण्यासही अडचण होऊ शकते. 

७) व्यक्तीमत्वात बदल

तुम्ही विनाकारण आक्रामक होऊ शकता किंवा चिंतेत राहू शकता. हा आजार झाल्यावर तुम्ही तसे सामान्य व्यक्तीच असता पण तुमच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल होतो. आणि जसेही तुम्ही यातून बाहेर येता तेव्हा पुन्हा शांत व्यक्ती होता. 

Web Title: Cause, symptoms of Alzheimers disease and how to prevent Alzheimer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.