अभिनेत्री अनुष्का शर्मा 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या नक्की काय आहे 'हा' आजार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 10:19 AM2018-09-07T10:19:03+5:302018-09-07T10:20:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका आजाराने ग्रस्त असून त्यासाठी ती ट्रिटमेंट घेत आहे. डॉक्टरांनी अनुष्काला 3 ते 4 आठवडे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.

bollywood actress anushka sharma suffering with bulging disc disease know abou symptoms causes and treatments tips | अभिनेत्री अनुष्का शर्मा 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या नक्की काय आहे 'हा' आजार?

अभिनेत्री अनुष्का शर्मा 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या नक्की काय आहे 'हा' आजार?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका आजाराने ग्रस्त असून त्यासाठी ती ट्रिटमेंट घेत आहे. अनुष्काला बल्जिंग डिस्क नावाचा आजार झाला आहे. बल्जिंग डिस्कमुळे प्रचंड अंगदुखीचा त्रास सतावतो. बल्जिंग डिस्क या आजाराला हार्नियेटेड डिस्कही म्हटले जाते. सध्या हा आजार अनेक जणांमध्ये आढळून येतो. हा आजार पाठीच्या मणक्यापासून सुरु होतो. त्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीराच्या हाडांपर्यत पोहोचतो. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांनाही प्रचंड वेदना होतात. मीडिया रिपोर्टनुसार, बल्जिंग डिस्कमुळे वैतागलेल्या अनुष्काला डॉक्टरांनी 3 ते 4 आठवडे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात नक्की बल्जिंग डिस्क आहे तरी काय? आणि त्या आजाराची लक्षणं आणि कारणे....

काय आहे बल्जिंग डिस्क?

बल्जिंग डिस्कला हर्नियेटेड डिस्क असंही म्हटलं जातं. या आजार झालेल्या व्यक्तिच्या नर्वस सिस्टिमवरही परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये प्रचंड वेदना होतात. या आजाराचा प्रभाव हार्नियेटेड डिस्कवर अवलंबून असतो. हार्नियेटेड डिस्कचा त्रास जर लोअर बॅकमध्ये असेल तर लोअर बॅकमध्ये याचा परिणाम जास्त होतो. जर हार्निेटेड डिस्क मानेजवळ असेल तर त्यामुळे मानेला प्रचंड वेदना होतात. तसेच त्याचा परिणाम खांदे आणि हातांवरही होतो. 

बल्जिंग डिस्कची लक्षणं -

- हात किंवा पायदुखी

- हात आणि पाय सु्न्न पडतात

- मांसपेशी कमकुवत होतात.

- या आजाराने प्रभावित झालेल्या अवयवांची हालचाल करणं अशक्य होतं.

बल्जिंग डिस्कपासून बचाव करण्यासाठी उपाय -

- दररोज व्यायाम करावा. व्यायाम करताना स्विमिंग आणि वॉकिंगवर भर द्यावा.

- बसताना व्यवस्थित बसावं. पाठीचा मणका आणि डिस्कवर बसताना किंवा उठताना भार येणार नाही याची काळजी घ्या.

- BMI (Body mass index) कंट्रोलमध्ये ठेवा. वजन जास्त किंवा कमी असू नये.

- फळं आणि भाज्या यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. हे शरीराची सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

- जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

- या आजार पूर्णपमे ठिक करण्यासाठी चंगल्या न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

- आजार जास्त वाढला तर सर्जरीही करावी लागते. 

- डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजियोथेरपीही घेऊ शकता. यामुळे मांसपेशींना आराम मिळेल.

Web Title: bollywood actress anushka sharma suffering with bulging disc disease know abou symptoms causes and treatments tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.