खाली बसून जेवण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 11:57 AM2018-04-07T11:57:53+5:302018-04-07T11:57:53+5:30

जमिनीवर जेवायला बसण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. ती स्टाईल नसून एक पचन प्रक्रिया आहे. पण अलिकडे लोक याकडे जुनी पद्धत म्हणून बघतात. चला तर जाणून घेऊया काय आहेत याचे फायदे!

Benefits of sitting on floor while eating | खाली बसून जेवण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

खाली बसून जेवण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

googlenewsNext

बदलत्या काळात रोजच्या जीवनातही बराच फरक पडला आहे. पूर्वीसारखं आता जेवण्यासाठी खाली बसणं फार कमी झालं आहे. आता घरा घरात डायनिंग डेबल स्थिरावला आहे. पण जमिनीवर जेवायला बसण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. ती स्टाईल नसून एक पचन प्रक्रिया आहे. पण अलिकडे लोक याकडे जुनी पद्धत म्हणून बघतात. चला तर जाणून घेऊया काय आहेत याचे फायदे!

* जमिनीवर बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचतं. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यात मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटाचे विकारही होत नाहीत.

* जेवायला मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो, तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.

* जास्त जेवणापासून दूर राहता येते

सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसणे आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण केल्यास योग्य प्रमाणाक जेवण करता येतं. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते.

* पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीच्या समस्या दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असतं. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळतं की, आपलं पोट भरलं आहे. खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे जात असतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. याने अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जातं.

* कॅलरीज कमी होतात

जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येतं. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.

* गुडघे दुखीची समस्या दूर होते

जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, समस्या दूर राहतात.

* हृदयाला स्वस्थ ठेवत

मांडी घालून बसणं हे वेगवेगळ्या योगासनातील एक आसन आहे. या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असतं आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहतं. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.
 

Web Title: Benefits of sitting on floor while eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.