जिममध्ये तुम्ही बॉडी कमवताय कि गमवताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:15 PM2017-12-25T16:15:37+5:302017-12-25T16:16:08+5:30

चाचपून बघा स्वत:ला आणि व्हा वेळीच सावध

Are you losing your body to gym? | जिममध्ये तुम्ही बॉडी कमवताय कि गमवताय?

जिममध्ये तुम्ही बॉडी कमवताय कि गमवताय?

Next
ठळक मुद्देअति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते.काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.असे लोक कस्सून व्यायाम तर करतातच, पण दिवसभर त्यांच्या डोक्यात, मनातही तोच विचार असतो.

- मयूर पठाडे

व्यायामाची आवड असणं चांगलंच, पण त्याचं जेव्हा व्यसन होऊ लागतं, तेव्हा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. दुर्दैवानं व्यायामाचं अ‍ॅडिक्शन असणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि तज्ञांनी त्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.
थोडंसं लक्ष दिलं तर आपल्यालाही कळू शकतं कोणाला व्यायामाच्या वेडानं झपाटलं आहे ते. प्रत्यक्ष त्या व्यायामपटूला मात्र आपण ‘अति’ करतोय हे अनेकदा लक्षातच येत नाही.
त्यांनी स्वत: जर आत्मपरिक्षण केलं तर त्यांना ते कळू शकतं, पण ते समजून घेण्याची अनेकांची तयारी नसते.
अति व्यायाम करणाºयांची काय आहेत लक्षणं?
१- व्यायामाचं अ‍ॅडिक्शन अनेकांमध्ये इतकं वाढतं की आपण समाजाचा एक घटक आहोत, हेच ते विसरतात. अनेक विद्यार्थी, नोकरदार तर कॉलेज किंवा आपल्या कामावर जाण्यापेक्षाही व्यायाम करून घाम गाळण्याला जास्त पसंती देतात.
२- अति व्यायामामुळे त्यांच्या शरीराची हानी तर होतेच, पण अनेकदा एवढ्या तीव्र व्यायामासाठी त्यांचं शरीरही सुदृढ राहात नाही, तरीही त्यांना त्याची पर्वा नसते.
३- जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्याकडे त्यांचा ओढा असतो.
४- अति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते.
५- काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.
६- असे लोक कस्सून व्यायाम तर करतातच, पण दिवसभर त्यांच्या डोक्यात, मनातही तोच विचार असतो.
बघा, तुम्ही स्वत: असे असाल, किंवा तुमच्या परिचयाचं कोणी असं असेल, तर वेळीच त्यापासून सावध व्हा आणि आपल्या मित्र, मैत्रिणींनाही त्यापासून सावध करा. अशानं बॉडी कमवण्याऐवजी तुम्ही बॉडी गमवाल..

Web Title: Are you losing your body to gym?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.