5 day potato diet will help you lose weight | ५ दिवस खा केवळ बटाटे, वजन कमी करण्यास होईल फायदा!
५ दिवस खा केवळ बटाटे, वजन कमी करण्यास होईल फायदा!

वजन वाढल्याचा किंवा वजन कमी करण्याचा जिथेही विषय होतो, तिथे बटाट्यांचा उल्लेख होताना बघायला मिळतो. कारण अनेकांमध्ये असा समज आहे की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण हा अनेकांमध्ये असलेला समज चुकीचा आहे. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना कार्बोहायड्रेट्सपासून दूर राहण्याचा सल्ला देताना अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. पण बटाटे वजन वाढण्याला जबाबदार नाही तर कमी करण्यास मदत करतं. मात्र, एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे की, ५ दिवसांपर्यंत केवळ बटाटे खाऊन वजन कमी करता येतं.  

रोज खा बटाटे

जर्नल मॉलिक्यूलर ऑफ न्यूट्रिशन अॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खावे. इतकेच नाही तर तुम्ही केवळ ५ दिवसांपर्यंत बटाटे डाएट फॉलो कराल तर तुमचं काही किलो वजन कमी होऊ शकतं. याचं कारण म्हणजे बटाटे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि सतत भूक लागत नाही. म्हणजे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहू शकता.

कॅलरी असतात कमी

या नव्या रिसर्चनुसार, बटाटे वजन कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करतात. कारण हे एक असं कंदमूळ आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं आणि कॅलरी कमी असतात. तसेच मेटाबॉलिज्मला मजबूत करण्यासोबतच वजन कंट्रोल करण्यासही मदत होते. 

वजन कमी होतं, आरोग्य बिघडत नाही

एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये १६८ कॅलरी असतात, तर उकडलेल्या बटाट्यामध्ये १०० कॅलरी असतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, बटाटा एक असा पदार्थ आहे ज्याने वजन तर कमी होतं, सोबतच आरोग्यही चांगलं राहतं. म्हणजे दिवसातून तुम्ही १० जरी बटाटे खाल्लेत तर इतर पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी तुम्ही घेता आणि सोबतच हेल्दी रहाल. 

पोषक तत्त्वे

बटाट्यामध्ये फायबर आणि प्रोटीन यांच्यासोबतच व्हिटॅमिन बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फरससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. 

वाढतं वय लपवा

वाढत्या वयाचा खुणा नाहीशा करण्यासाठी असा नवा उपाय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यावर नामी उपाय आहे तो बटाटे खाण्याचा. नेहमी खातो त्यापेक्षा हे बटाटे वेगळे आहेत. हे बटाटे खाल्ल्याने वाढत्या वयाच्या खुणा नाहीशा होतात. शिवाय रोगांपासूनही बचाव होतो. या बटाट्यांचा रंग काहीसा जांभळा असून हे वाण विकसित करण्यासाठी पाच वर्षे लागली. ते काहीसे रताळ्यासारखे दिसतात. कृषी शास्त्रज्ञांनी या बटाट्यांचे २० नवीन वाण विकसित केले आहेत. यात सी जीवनसत्त्वाचे प्रमाण तीन पट अधिक असून ऑक्सिकरण रोधक तत्त्वामुळे वृद्धत्त्वाची प्रक्रियाही थांबते. रोगांपासून बचाव करण्यासाठी सुरुवातीला हा बटाटा टेस्ट ट्यूबमध्ये विकसित केला जातो. नंतर शेतात लागवड केली जाते. आरारुटचे प्रमाण खूप कमी असल्याने रंग जांभळा झाला आहे. शिजवल्यानंतरही जांभळा रंग कायम राहतो.


Web Title: 5 day potato diet will help you lose weight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.