प्रौढ कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:41 AM2019-02-03T00:41:41+5:302019-02-03T00:42:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे मात्र विदेशी खेळांच्या स्पर्धेत हा खेळ लुप्त होत ...

Your duty to promote adult kabaddi players | प्रौढ कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य

प्रौढ कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बिरसोला येथे कबड्डी स्पर्धेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे मात्र विदेशी खेळांच्या स्पर्धेत हा खेळ लुप्त होत होता. एकेकाळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यामुळे चांगले खेळाडू सुध्दा तयार होत होते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी नाव केले आहे. त्यामुळेच या खेळाला पुर्नजीवीत करण्यासाठी प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना मंच उपलब्ध करुन दिला आहे. प्रौढ कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहान देणे आपले प्रथम कर्तव्य असल्याची ग्वाही आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
तालुक्यातील बिरसोला येथे शुक्रवारी (दि.१) आयोजित प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कत्तेलाल मात्रे, माजी जि.प.सदस्य रुद्रसेन खांडेकर, देवेंद्र मानकर, राजेश जमरे, अमृत तुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद तुरकर, आशिष चव्हान, मुलचंद देशकर, पं.स.सदस्य प्रकाश देवाधारी, उपसरपंच निर्वताबाई पाचे, लोकचंद दंदरे, बबीता देवाधारी, पोलीस पाटील दिलीप तुरकर, कपुरचंद पाचे, रामभगत पाचे, कांतीबाई पाचे, डॉ.देवा जमरे, कविता दांदरे, सरोजनी दांदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, रुखी पाचे, माणिकचंद तुरकर, श्यामराव तुरकर, कैलाश देवाधारी उपस्थित होते.
या वेळी अग्रवाल यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अग्रवाल म्हणाले, सध्या स्थिती क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवक आपले भविष्य साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे खेळांडूना प्रोत्साहान देवून मंच उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे.
गोंदिया येथे राज्यस्तरीय क्रीडा संकुल आणि कामठा येथे दर्जेदार क्रीडा संकुल तयार झाल्यानंतर युवा खेळाडूंना वाव मिळण्यास मदत होईल. गोंदिया येथील क्रीडा संकुलात स्विमींग पुलाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू तयार होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन जिल्ह्याचे नाव मोठे करावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Your duty to promote adult kabaddi players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.