युवतींनी सिकलसेलची तपासणी करुन घ्यावी

By admin | Published: December 18, 2014 01:26 AM2014-12-18T01:26:32+5:302014-12-18T01:26:32+5:30

आजही ग्रामीण भागातील बहुतांश लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे. अशांना शिक्षीत करण्याची आज गरज आहे.

The women should check the sickle cell | युवतींनी सिकलसेलची तपासणी करुन घ्यावी

युवतींनी सिकलसेलची तपासणी करुन घ्यावी

Next

देवरी : आजही ग्रामीण भागातील बहुतांश लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे. अशांना शिक्षीत करण्याची आज गरज आहे. या भागातील युवतींना जर निरोगी व सिकलसेलमुक्त पिढीची निर्मिती करायची व सिकलसेल मुक्त पिढीची निर्मिती करायची असेल तर त्यांनी विवाहपुर्वी कुंडली न तपासता आपल्या जोडीदाराशी रक्त तपासणी करुनच लग्न करावे, असे आवाहन जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले.
देवरी येथे शासकिय मुलीेंच्या वसतिगृहात सिकलसेल नियंत्रण सप्तहानिमित्त आयोजित रक्ततपासणी शिबिरात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
हा शिबिराचा कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जि.प. विभाग गोंदिया, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था फूलचूर आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरीच्या संयुक्त विद्यमानाने देवरी येथील शासकीय मुलींचे वस्तिगृहात सिकलसेल सप्ताहात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन क्रांतीवीर बिरसामुंडा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन देवरी पं.स. चे सभापची कामेश्वर निकोडे, यांच्याहस्ते आणि गोंदिया जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील जास्तित जास्त युवतींनी आपले सिकलसेलचे रक्त तपासणी करुन घ्यावे, असे आवाहन यावेळी पाहुण्यांनी केले.
या प्रसंगी माजी पं.स. सभापती उषा शहारे, डॉ. मीना वट्टी, जिल्हा सिकलसेल समन्वयक खंडाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हुमने, मल्ला प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता मरापे आणि शा. मुलीचे वस्तीगृहातील अधीक्षक कटनाहके व वाघमारे सह तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभापती निकोडे, माजी सभापती शहारे, दुमणे, सिकलसेल पर्यवेक्षक तावाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पुराम यांनी सिकलसेल नियंत्रणाबद्दल योग्य मार्गदर्शन केले. या रक्ततपासणीत २०० मुलीचे रक्त तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४८ मुलीचे रक्त तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६ मुलीचे मुलीचे नमुने पॉझिटीव्ह निघाले. कार्यक्रमाचे संचालन क्षयरोग तज्ज्ञ डॉ. संजय भागवतकर यांनी केले. आभार सोनटक्के यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The women should check the sickle cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.