‘विदर्भवीरां’वरील कारवाईचे सोशल मीडियावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:55 PM2019-02-21T22:55:37+5:302019-02-21T22:56:40+5:30

शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही.

Welcome to the social media on 'Vidarbavira' action | ‘विदर्भवीरां’वरील कारवाईचे सोशल मीडियावर स्वागत

‘विदर्भवीरां’वरील कारवाईचे सोशल मीडियावर स्वागत

Next
ठळक मुद्देरेल्वस्थानकावर लावा कॅमरे : इतरही विभागात कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या विदर्भवीर अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.२०) केली. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर दिवसभर व्हाट््सअ‍ॅप, फेसबुकवर या कारवाहीचे स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी विदर्भवीरांवर केलेली कारवाही योग्य आहे. अधिकारी व कर्मचाºयांच्या अपडाऊन संस्कृतीमुळे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागते. विशेष म्हणजे आरोग्य सेवा ही महत्त्वपूर्ण सेवा असतांना सुध्दा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी दररोज अपडाऊन करतात. त्यामुळे बरेचदा रुग्णांना विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. विदर्भवीर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होती.
लोकमतने सुध्दा हा विषय लावून धरला होता. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी बलकवडे यांनी नियोजन विभागाच्या चार अधिकाऱ्यांवर कारवाही केली. तसेच त्यांचा घरभाडे व नक्षलभत्ता कायमस्वरुपी थांबविला. या कारवाहीचे जिल्हावासीयांनी स्वागत केले. तर लोकमतच्या बातमीचे कात्रण विविध व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत होते. यावर काही ग्रुपवर जोरदार चर्चा सुध्दा झाली. विदर्भवीरांना वचक लावण्यासाठी रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅमरे लावण्यात यावे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोडलेल्या घरभाडे पावतीची सुध्दा खातरजमा करण्याची मागणी केली.

Web Title: Welcome to the social media on 'Vidarbavira' action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.