सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांंनी साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:02 AM2019-05-24T00:02:22+5:302019-05-24T00:02:53+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्याच्या राजकारणात अडीच वर्षांपुर्वी पाय ठेवलेल्या सुनील मेंढे यांच्या कार्यकिर्दला भंडाराचे नगराध्यक्ष म्हणून सुरूवात झाली.

Villagers celebrate Diwali by Sunil Mhedhe | सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांंनी साजरी केली दिवाळी

सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांंनी साजरी केली दिवाळी

Next
ठळक मुद्देआसगावच्या ग्रामस्थांना आता विकासाची प्रतीक्षा । पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जिल्ह्याच्या राजकारणात अडीच वर्षांपुर्वी पाय ठेवलेल्या सुनील मेंढे यांच्या कार्यकिर्दला भंडाराचे नगराध्यक्ष म्हणून सुरूवात झाली. अल्पावधीतच बरीच कामे त्यांनी भंडारा शहरात खेचून आणली. मेंढे हे पवनी तालुक्यातील आसगाव येथील मूळ रहिवासी होत. आजही त्यांचे तिथे घर असून सतत जाणे-येणे असते. जिल्हा पातळी ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणांशी त्यांची नाळ जुळली गेली असली तरी त्यांचे आसगाव या जन्मगावचे प्रेम अबाधित आहे.
भंडाराच्या नगराध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असताना भाजपने त्यांना खासदार पदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी घोषीत केली. अशातच निकाल लागल्यावर गुरूवारी गावात एकच जल्लोष करण्यात आला. जवळपास दोन लाखांच्या घरात मते अधिक घेवून निवडून आल्याने विजयाचा आनंद द्विगुणीत झाला.
क्षणाक्षणाने मतमोजणी केंद्रातून तथा आॅनलाईनवर उपलब्ध माहितीच्या आाधारे लढतीचे चित्र स्पष्ट होत गेले. उल्लेखनीय म्हणजे पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना मताधिक्य मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अजूनच वाढतच होता. परिणामी गावात व बाहेर सदस्य, कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवित विजयाचा आनंद द्विगुणीत केला.
सायंकाळच्या सुमारास आसगाव येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यगण व ग्रामस्थांनी एकत्र येवून मेंढे यांच्या विजयाबद्दल एकमेकांना पेढे वाटून शुभेच्छा दिल्या. ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातच भाजपच्या दणदणीत विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला. भंडारा शहरातून सायंकाळच्या सुमारास सुनील मेंढे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
 

Web Title: Villagers celebrate Diwali by Sunil Mhedhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.