नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:05 AM2019-06-14T00:05:58+5:302019-06-14T00:06:42+5:30

तिरोडा तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून हे काम जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. मात्र या नळ योजनेसाठी पाईप लाईन वन जमीन आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून टाकली जात आहे.

Unauthorized digging of pipelines of pipelines | नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम

नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रताप : शेतकऱ्याची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून हे काम जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. मात्र या नळ योजनेसाठी पाईप लाईन वन जमीन आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून टाकली जात आहे. यासाठी या दोघांची परवानगी घेण्यात आली नसून बेकायदेशीरपणे काम केले जात असल्याची तक्रार शेतकऱ्याने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार नरेश धनराज ठवकर यांची निलागोंदी येथे सर्वे क्रमाक ६३ मध्ये ०.१७ हेक्टर शेती आहे. त्यांच्या जमिनीवर पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीसाठी खोदकाम करताना जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सदर शेतकºयाला सुध्दा विश्वासात घेतले नाही. ठवकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याची संबंधित विभागाकडे तक्रार केली. तेव्हा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागा तुमच्या मालकीचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठवकर यांनी भूमि अभिलेख विभागाकडे पैसे भरुन जमिनीची मोजणी करुन घेतली. तेव्हा पाणी पुरवठा विभागाने तयार केलेली विहीर ही ठवकर यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र यानंतरही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ऐकायला तयार नसल्याने ठवकर यांनी जि.प.पाणी पुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना वकीलामार्फत नोटीस देऊन उत्तर मागीतले आहे. नियमानुसार पाणी पुरवठा विभागाने मुरमाडी येथील नळ योजनेसाठी विहिरीचे खोदकाम आणि पाईप लाईन टाकतांना सदर शेतकऱ्याला विश्वासात घेण्याची गरज होती.शिवाय विहिरीचे खोदकाम त्यांच्या जागेत करीत असताना त्याची लेखी परवानगी आणि तेवढ्या जागेचा मोबदला ठवकर यांना देणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता शेतकºयाला टोलाटोलवीचे उत्तर देऊन त्याची दिशाभूल करण्यास सुरूवात केली आहे.
पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतने केलेले काम बेकायदेशीर असून याविरुध्द न्यायालयात जाण्याचा इशारा ठवकर यांनी दिला आहे. मुरमाडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आपला विरोध नाही. पण आपल्या शेत जमिनीत पाईप लाईन आणि विहिरीचे खोदकाम करताना आपली परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता उलट पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आपल्याला भिती दाखवित असल्याचे नरेश ठवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

वन कायद्याचे उल्लघंन
पाणी पुरवठा विभागाने मुरमाडी येथील नळ योजनेच्या कामासाठी पाईप लाईन टाकताना वन विभागाच्या राखीव जागेत खोदकाम केले आहे.हे खोदकाम सुध्दा बेकायदेशीर असून याची उपवनसंरक्षकाकडे तक्रार करण्यात आली आहे.त्याची चौकशी करण्याचे निर्देश सुध्दा वन विभागाच्या अधिकाºयांनी दिले आहे.

Web Title: Unauthorized digging of pipelines of pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.