गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:35 AM2018-12-01T10:35:09+5:302018-12-01T10:35:33+5:30

दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ घडली.

Trucks accident in Gondia district; 4 people killed | गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदोन मृतांची ओळख पटली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ घडली. रवि यादव ३०, रा. महारुमकला, जिल्हा राजनांदगाव, जावेद हाला, बाकानेर गुजरात व दोन अनोळखी इसमांचा मृतांमध्ये समावेश आहे. आशिक नाथाभाई समा असे गंभीर असलेल्या चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक जीओ-4,टीए-९९०२ हा ट्रक रायपूर कडून नागपूरकडे जात होता तर जीजे-०३,ए२-२८४५ हा ट्रक देवरीवरुन रायपूरकडे जात होता. दरम्यान देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला. दरम्यान सिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहचत जखमीला देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघात मृत्यू झाल्यांपैकी दोन जणांची ओळख पटली असून दोन जणांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Trucks accident in Gondia district; 4 people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात