दुचाकीस्वारास वाचविण्यात ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:48 PM2018-03-23T22:48:28+5:302018-03-23T22:48:28+5:30

तुमसर मार्गावरील धापेवाडा उपसा सिंचन कार्यालय ते मोठा नाला दरम्यान असलेल्या वळणावर दुचारीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्न ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला.

Truck accident | दुचाकीस्वारास वाचविण्यात ट्रकचा अपघात

दुचाकीस्वारास वाचविण्यात ट्रकचा अपघात

Next
ठळक मुद्देट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला

ऑनलाईन लोकमत
तिरोडा : तुमसर मार्गावरील धापेवाडा उपसा सिंचन कार्यालय ते मोठा नाला दरम्यान असलेल्या वळणावर दुचारीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्न ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला.
ट्रक क्रमांक एमएच ३५- के ५०६५ मेंढा येथील डांबर प्लांटमधून तिरोडाकडे येत होता. दरम्यान मोठा नाला जवळील वळणावर समोरून येत असलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला झाडावर आदळला. या अपघातात दुचाकीस्वार व ट्रक चालक कुणालाही मार लागला नाही.
या वळणावर झुडप असल्याने समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे येथे अपघातांची शक्यता बळावली आहे. अशात सार्वजनिक बांधकाम विभागाने या वळणावरील झुडप कापावे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात