जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये ‘तंबाखूबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 09:45 PM2018-10-28T21:45:35+5:302018-10-28T21:46:30+5:30

विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाºया तंबाखूच्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत.

Tobacco smoking in 1684 schools in the district | जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये ‘तंबाखूबंदी’

जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये ‘तंबाखूबंदी’

Next
ठळक मुद्देशाळेच्या १०० मीटर परिसरात विक्रीस बंदी : उल्लंघन करणाऱ्यांना २०० रूपये दंड

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाºया तंबाखूच्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. तंबाखूला जवळ येऊ देणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनाही देण्यात आली आहे.
कर्करोगासारखा असाध्य रोग या तंबाखूपासून जडतो. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यसन व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही जिल्ह्यात तंबाखू खाणाºयांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखूमुक्त करण्याचे दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा आतापर्यंत तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक शाळांत ‘तंबाखूमुक्त शाळा’ असे लिहिण्यात आले आहे.
जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियानातून एकही शाळा सुटली नसून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१४ शाळा, आमगाव १५८, देवरी २१०, गोंदिया ४०९, गोरेगाव १५९, सडक-अर्जुनी १७६, सालेकसा १५६ व तिरोडा २०१ अशा १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Tobacco smoking in 1684 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा