तंटामुक्तीने लावलेल्या लग्नांची नोंद घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:57 AM2017-07-25T00:57:10+5:302017-07-25T00:57:10+5:30

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अमंलात आणली.

Take note of wedding anniversaries | तंटामुक्तीने लावलेल्या लग्नांची नोंद घ्या

तंटामुक्तीने लावलेल्या लग्नांची नोंद घ्या

Next

प्रेमप्रकरणातूनच आंतरजातीय विवाह : १७० आंतरजातीय, ९२ प्रेमविवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अमंलात आणली. गोंदिया जिल्ह्यातही आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहेत. मागील सात वर्षात गोंदिया जिल्ह्यात हजारावर आंतरजातीय विवाह झाले.
जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी घडवून आणले. या विवाहाला सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे आंतरजातीय व प्रेमविवाह लावून दिले.
तंमुसने लावलेले अनेक आंतरजातीय विवाहाचे जोडपे समाज कल्याण विभागाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत: अर्ज केले नाही किंवा तंटामुक्त समितीनेही पुढाकार घेतला नाही.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मुलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी शांततेत पार पाडण्याबरोबर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.

५२१ जोडप्यांना लाभ
अस्पृश्य निवारण्यासाठी आंतरजातीय योजना अमंलात आणली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देण्याचे काम शासन १९५८ पासून करीत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती व दुसरा व्यक्ती दुसरा म्हणजेच सुवर्ण, हिंदू लिंगायत असल्यास आंतरजातीय मानण्यात येते. शासनाने सदर योजनेंतर्गत ३० जानेवारी १९९८ पासून १ हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येत होती. परंतु १ फेब्रुवारी २०१० पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१०-११ पासून सन २०१६-१७ पर्यंत ५२१ जोडप्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ देण्यात आला. जातीयवादाला बगल देत तरूणमंडळी प्रेम प्रकरणातून या आंतरजातीय विवाहाकडे वळत आहेत.
प्रोत्साहनपर जोडप्यांना दिले २ कोटी ४७ लाख
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन राशी देण्यात येते. सन २०१०-११ या वर्षात ३२ जोडप्यांना ४ लाख ८० हजार, सन २०११-१२ या वर्षात २५ जोडप्यांना १२ लाख ४५ हजार, सन २०१२-१३ या वर्षात १४२ जोडप्यांना ६९ लाख ५५ हजार, सन २०१३-१४ या वर्षात ६७ जोडप्यांना ३२ लाख ८० हजार, सन २०१४-१५ या वर्षात १०४ जोडप्यांना ५१ लाख ९५ हजार, सन २०१५-१६ या वर्षात ७५ जोडप्यांना ३७ लाख ५० हजार, सन २०१६-१७ या वर्षात ७६ जोडप्यांना ३८ लाख रूपये देण्यात आले.

Web Title: Take note of wedding anniversaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.