शेतकऱ्यांना रोहयोचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:44 PM2017-12-12T22:44:08+5:302017-12-12T22:48:01+5:30

यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

Support for farmers | शेतकऱ्यांना रोहयोचा आधार

शेतकऱ्यांना रोहयोचा आधार

Next
ठळक मुद्देमजुरांच्या हाताला मिळाले काम : शेतकऱ्यांना झाली मदत

आॅनलाईन लोकमत
निंबा-तेढा : यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना धानाच्या शेतीची लागवड करता आली नाही. लागवड झालीच तर खूप कमी प्रमाणात. अशा शेतकऱ्यांना आता रोजगार हमी योजनेचा आधार मिळाला आहे.
ज्या शेतकºयांना पाण्याचे कोणतेच साधन नव्हते, जे शेतकरी वरच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांनी नदी, नाले तसेच खड्ड्यातील पाणी मोटार पंपाद्वारे घेवून धानाची रोवणी केली. मात्र पावसाने एैनवेळीे दगा दिल्याने हाती आलेले पिक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेकडो हेक्टर जमीन पडीक राहिली. कित्येक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन तसेच घरातील दागिने गहान ठेऊन धानाचे बियाणे व खत खरेदी केले. ते आता कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत होते.
एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे हाताला काम नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु निंबा क्षेत्रातील शेतकरी व मजुरांना रोहयोचा आधार मिळाला आहे. यावर्षी निंबा वनक्षेत्रात गावकरी तसेच गावातील व जंगलातील जनावरांच्या हितासाठी तब्बल २ कोटी रुपयांची कामे वनविभागामार्फत मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे निंबा वनक्षेत्रात येणाऱ्या गावांतील शेतकरी व मजुरांना याचा लाभ मिळणार आहे. निंबा येथे सुरु झालेल्या वनविभागाच्या अंतर्गत येणाºया रोहयोच्या पहिल्या कामावर एकूण २०० शेतकरी व मजुरांंना रोजगाराचा आधार मिळाला आहे. या कामामुळे शेतकरी व मजुरांची थोडीफार मदत होऊन त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागणार आहे. या सर्व कामांची देखरेख वन अधिकारी शेंडे व रोजगार सेवक हेमराज कोसरे करीत आहेत.

Web Title: Support for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.