विद्यार्थिनींना मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 AM2018-01-18T00:24:29+5:302018-01-18T00:24:41+5:30

ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठी जगण्याचा मंत्र सोमवारी नागपूर येथील साहित्यकार प्रा. विजया मारोतकर यांनी देवरी येथील सर्व शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनींना दिला.

Students get the mantra to succeed | विद्यार्थिनींना मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र

विद्यार्थिनींना मिळाला यशस्वी होण्याचा मंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देविजया मारोतकर : भाजपतर्फे ‘पोरी जरा जपून’ प्रबोधनात्मक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठी जगण्याचा मंत्र सोमवारी नागपूर येथील साहित्यकार प्रा. विजया मारोतकर यांनी देवरी येथील सर्व शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनींना दिला.
भाजप महिला आघाडी देवरी व माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या वतीने ‘पोरी जरा जपून’ प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यात विविध शाळा, कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच महिलांनी प्रा. मारोतकर यांचे प्रबोधन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अतिथी म्हणून विदर्भ भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष सुभाष घाटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग येरणे, माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, माजी सभापती देवकी मरई, प्रा. जयश्री येरणे, राजेश चांदेवार, नूतन कोवे उपस्थित होते.
विद्यार्थिनींना प्रबोधन करताना विजया मारोतकर म्हणाल्या, कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश आहे की ‘लेक संपू नये’, त्याकरिता हे प्रबोधन आहे. राक्षसीवृत्ती आजही समाजात कायम आहे. मुलींनी स्वत:ची बंधने झुगारली तर आपलही रामायण झाल्याशिवाय राहणार नाही. बहिणीने भावाचे नाते शेवटपर्यंत जपायला पाहिजे. मोबाईलची गरज जेवढी आहे तेवढाच त्याचा उपयोग करा. अन्यथा हाच मोबाईल जीवनाची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांवर प्रेम करा. परंतु व्हॅलेंटाईनच्या भानगडीत पडून जीवन उद्धवस्त करु नका. स्त्री ही फक्त एकाच पुरुषासाठी निर्माण झाली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, प्रसिद्ध शायर निदा फाजली यांनी संपूर्ण जगाची व्याख्या एकाच शब्दात सांगतली होती. ‘शर्त लगी थी दुनिया मे एक लब्ज में लिखने की, लोग किताबे ढुंढते रहे और मेने ‘बेटी’ लिख दिया. याचाच अर्थ असा की जग एका बजूला व लेक एका बाजूला. इतके महत्व या लेकीला उरलं आहे. म्हणून स्वत:मध्ये जग शोधा. असा महत्वपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र मारोतकर यांनी दिला.
या वेळी संपूर्ण तीन तास स्तब्ध राहून छत्रपती शिवाजी हायस्कूल व कॉलेज, मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बाबुराव मडावी हायस्कूल, कमलादेवी जैन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तसेच परिसरातील महिलांनी प्रबोधनाचा लाभ घेतला.

Web Title: Students get the mantra to succeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.