वीज ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:20 AM2017-07-24T00:20:54+5:302017-07-24T00:20:54+5:30

येथील वीज वितरण कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Quick solution for power consumer complaints | वीज ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित समाधान

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित समाधान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : येथील वीज वितरण कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महावितरणचे गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी, गोंदिया प्रविभागाचे अधिक्षक अभियंता एल.एम.बोरीकर यांच्या मार्गदर्शनात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे, सालेकसा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.गजभिये, साखरीटोला विज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आर.डी.पाटील उपस्थित होते. या ग्राहक तक्रार निवारण शिबिरात जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करुन त्यांच्या तक्रारी मांडण्यात आल्या. तक्रारीचे निवारण वेळेवर होत असल्यास त्वरीत निकाली काढण्यात आले.
वीज ग्राहकांनी या शिबिरात साखरीटोला व इतर गावातील बील दुरूस्ती, नवीन वीज कनेक्शन, सोलर उर्जा नवीन कनेक्शन, नवीन विद्युत खांबासंदर्भात तक्रारी मांडल्या. या तक्रारींबाबत सर्वाचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करुन त्वरीत दुरध्वनी संदेश देण्यात आले. तक्रारींचे जागेवरच मीटर देऊन त्वरीत निराकरण करण्यात आले.
ग्राहक तक्रार निवारण शिबिरात येथील कनिष्ठ अभियंता आर.डी.पाटील यांनी शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती दिली. वीज बिल वेळेवर भरणे, आपले वीज मीटर सुरक्षित ठेवणे ही आपली स्वत:ची जवाबदारी आहे. वीजचोरी कुणीही करू नये वीज चोरीमुळे घरातील अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पोलीस तक्रार झाली आहे. वीज चोरी करु नये व स्वाभीमानाने जगावे असे याप्रसंगी उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

Web Title: Quick solution for power consumer complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.