चिकाटीनेच शिखर गाठता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:01 PM2018-09-12T22:01:08+5:302018-09-12T22:02:13+5:30

नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.

Only persistence can be achieved | चिकाटीनेच शिखर गाठता येते

चिकाटीनेच शिखर गाठता येते

Next
ठळक मुद्देअनिल सोले : रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिरात केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने येथे मंगळवारी (दि.११) आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिट या रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार डॉ. परिणय फूके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, कार्यक्र माचे संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, छाया दसरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, पंचायत समिती सदस्य रामराज खरे, नगर परिषद गटनेता घनश्याम पानतवने, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, निरज कटकवार, गजेंद्र फूंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. सोले यांनी, यश व अपयशामध्ये फार कमी अंतर असते. मात्र, कुठल्याही कार्यात सातत्य राखल्यास अपयशाला यशात बदलता येते. आजचा हा मेळावा युवकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार असून दरवर्षी जिल्ह्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्र माचे संयोजक अग्रवाल यांनी प्रास्तावीकातून, जिल्ह्यातील हजारो तरु णांच्या हाताला काम मिळावे, ते मोठे व्हावे, त्यांना योग्य दिशा सापडावी, त्यांचे भविष्य सुकर व्हावे हे या कार्यक्र माचे उद्देश असून जिल्ह्यातील युवक-युवती या मेळाव्याच्या माध्यमातून घडणार असल्याचे मत मांडले. याप्रसंगी आ. फुले, आ. रहांगडाले व आ. पुराम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर मेळावा दोन सत्रात घेण्यात आला. ज्यामध्ये पहिल्या सत्रात संपादक संजय तिवारी यांनी युवकांना यशस्वी होण्याचे मंत्र देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी उपस्थित युवक-युवतींना लक्ष्य प्राप्तीसाठी शून्यातून ते शिखर गाठण्याचे अनेक प्रेरक उदाहरणातून सांगितले. तसेच आत्मविश्वास व यशासाठी दररोज एक तास व्यायामासाठी देण्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, मेळाव्यात बीपीओ, केपीओ, आॅटोमोबईल आदी संबंधीत ३४ कंपन्यांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत आलेल्या जिल्हा व परिसरातील युवक-युवतींची या कपंनीच्या अधिकाºयांनी चाचणी घेवून योग्यतेनुसार मुलाखती घेतल्या. तसेच निवड झालेल्यांना नियूक्ती पत्र दिले. संचालन अशोक हरिणखेडे यांनी केले. मेळाव्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
१४०० वर युवक -युवतींना जॉब आॅफर
मेळाव्याला सकाळी सुरु वात होताच जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येत युवक -युवतींनी गर्दी करीत योग्यतेनुसार संबंधित कंपन्यांच्या मुलाखतीला सामोरे गेले. ज्यामध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुमारे एक हजार ४०० युवक-युवतींना जॉब आॅफर पत्र देण्यात आल्याची व यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक अग्रवाल यांनी दिली.
मुलाखतीचे अनुभव आले
मेळाव्यात जिल्ह्यातील युवक-युवतींनी एकच गर्दी करत मोठ्या उत्सूकतेने कंपन्यांची मुलाखत दिली. तेव्हा मुलाखतीनंतर पहिल्यांदाच एक उत्साहपूर्ण अनुभव आल्याच्या प्रतिक्र ीया यावेळी त्यांनी व्यक्त करून असे मेळावे आमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार असून नोकरीची संधी मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Only persistence can be achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.