जुना बंद, तर नवीन पुलावरून जडवाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:43 PM2018-08-13T21:43:20+5:302018-08-13T21:44:01+5:30

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १३ आणि १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवारी (दि.१४) वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Off the old bridge, stop the jerk from the new bridge | जुना बंद, तर नवीन पुलावरून जडवाहतूक बंद

जुना बंद, तर नवीन पुलावरून जडवाहतूक बंद

Next
ठळक मुद्देदुरुस्तीचे काम सुरू : नवीन उड्डाणपुलाची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १३ आणि १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवारी (दि.१४) वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. तर हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी सुरू ठेवल्यास केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. यासंबंधीचे पत्र काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक बोलविली. त्यात जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय नवीन उड्डाणपुलावर पादचारी पूल नसल्याने हा पूल जडवाहतुकीसाठी सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर काय तोडगा काढता येईल, अशी विचारणा जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली. त्यात जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन शहरात येणारी जडवाहतुक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला होता. असे केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी होईल तसेच शहरवासीयांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करता या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहू द्यावी, अशी मागणी आ.गोपालदास अग्रवाल यांनी प्रशासनाकडे लावून धरली. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत प्रशासनाने जुना उड्डाणपूल हलक्या वाहनासाठी सुरू ठेवला होता.
मात्र रेल्वे विभागाने पुन्हा जिल्हा प्रशासनाला पत्र दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. तसेच जुन्या उड्डाणपुलावरून दुचाकी, कार, जीप यांच्याशिवाय इतर जड वाहने जावू नये, यासाठी पुलावर हाईट बॅरियर लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुध्दा सदोष असल्याने तुर्तास या पुलावरुन जडवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जड वाहने बालघाट मार्गावरील बायपास मार्गे वळविण्यात आली आहे.
विभागात समन्वयाचा अभाव
जुन्या आणि नवीन उड्डाणपुलाच्या समस्येवर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी काय करता येईल, यावर उपाय योजना करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. मात्र पुलाच्या दुरूस्ती व हाईट बॅरियर लावण्याची माहिती या विभागाना नव्हती. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला.
प्रवाशांना झळ
शहरातील जुन्या आणि नवीन उड्डाणपुलावरुन बसेस तसेच इतर जडवाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जयस्तंभ चौकात येणाऱ्या प्रवाशांना बायपास मार्गे वळसा घेवून यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याची झळ बसत असल्याने रोष व्याप्त आहे.
कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन व्यस्त
जुन्या आणि नवीन उड्डाणपुलाच्या समस्येचा सर्वाधिक फटका शहरवासीयांना आणि वाहन चालकांना बसत आहे. मात्र प्रशासन यावर त्वरीत उपाय योजना करण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे चित्र आहे.

Web Title: Off the old bridge, stop the jerk from the new bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.