२०० अतिक्रमणधारकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:30 AM2018-01-07T00:30:56+5:302018-01-07T00:32:11+5:30

शहरातील वाढत्या अतिक्रमणाची बाब नगर परिषदेने गांर्भियाने घेतली आहे. लवकरच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेने शहरातील दोनशे अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्यास सांगितले आहे.

Notice to 200 encroachment holders | २०० अतिक्रमणधारकांना नोटीस

२०० अतिक्रमणधारकांना नोटीस

Next
ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम : नगर परिषदेने सुरू केले काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील वाढत्या अतिक्रमणाची बाब नगर परिषदेने गांर्भियाने घेतली आहे. लवकरच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेने शहरातील दोनशे अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्यास सांगितले आहे. अन्यथा अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालविण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील मुख्य चौकातील रस्त्यांलगत आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. परिणामी रस्ते अरुंद झाले असून त्याचा त्रास वाहनचालक आणि शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. अतिक्रमणाची समस्या आजची नसून मागील दहा पंधरा वर्षांपासून कायम आहे. नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी यापूर्वी सुध्दा मोहीम राबविली.पण, अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाच अतिक्रमणधारकांनी मारहाण केल्याने ही मोहीम मध्येच बंद करण्यात आली. त्यामुळे तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होवू नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने यंदा सर्व बाबींची खातरजमा करुन आणि मोहिमेत सातत्य राहावे, याकरिता उपाय योजना केल्या आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याची माहीती दवंडीच्या माध्यमातून शहरवासीयांना दिली जात आहे. ज्या अतिक्रमणीत स्थळांना मार्र्कींग करुन नोटीस बजाविण्यात आली आहे. त्या अतिक्रमणधारकांना स्वत:हुन अतिक्रमण हटविण्याची सूचना नगर परिषदेने दिली आहे. यासाठी दोनशे अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रस्ते होणार रुंद
शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा काही व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र पाहयला मिळते. या समस्येत वाढ झाल्याने रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते रुंद केले जाणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या सुत्रांनी दिली.
भूमीअभिलेख विभागाचे काम मंदगतीने
शहरातील अतिक्रमणीत स्थळांचे मोजमाप करण्याची जबाबदारी भूमीअभिलेख विभागाचीे आहे. या विभागाने आठवडाभरापूर्वी मार्र्कींग करण्याचे काम सुरू केले होते. मात्र आता हे काम थांबविल्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याला विलंब होत आहे. हा विभाग नगर परिषदेला सहकार्य करित नसल्याची माहिती आहे.

सध्या नगर परिषदेत रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येईल.
चंदन पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया.

Web Title: Notice to 200 encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.