नक्षलवाद्यांना ४७ गावांत ‘बंदी’

By admin | Published: December 18, 2014 10:56 PM2014-12-18T22:56:18+5:302014-12-18T22:56:18+5:30

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या आरामाला विराम लावण्याचे काम गोंदिया पोलिसांनी सुरू केले आहे.

Naxalites get 'ban' in 47 villages | नक्षलवाद्यांना ४७ गावांत ‘बंदी’

नक्षलवाद्यांना ४७ गावांत ‘बंदी’

Next

चार गावांचे पुन्हा प्रस्ताव : तंटामुक्त मोहीम ठरली आदिवासी व पोलिसांमधील दुवा
गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या आरामाला विराम लावण्याचे काम गोंदिया पोलिसांनी सुरू केले आहे. जिल्ह्यातील १२२ नक्षलग्रस्त गावांपैकी ४७ गावात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या गावबंदीला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे सहकार्य मिळाले आहे.
सन २००४ ते आजपर्यंत जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम छेडली. यात सन २००५ यावर्षी नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपुरी, पवनी/धाबे, येरंडी/दर्रो, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सुकडी व येडमागोंदी या गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली.
त्यानंतर २००८ मध्ये १३ गावांनी गावबंदीचा प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यात सालेकसा तालुक्यातील डुंबरटोला, बंजारी, दलदलकुही, टोयागोंदी, डहाराटोला, वारकरीटोला, कोटरा, सिंगाटोला, करणूटोला, नवाटोला, हलबीटोला, कलारटोला ही बारा गावे तर देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिलापूरने हा प्रस्ताव सादर केला.
सन २०११ मध्ये २२ गावांनी प्रस्ताव सादर केला. यात अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवनीतपुर(भुटाई), डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोसबी, कोकणा(जमी.), देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा, पदमपूर, शिरपूरबांध, वडेगाव, सालेगाव, खांबतलाव, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत धाबेटेकडी, तिडका, देवलगाव, चान्ना/कोडका, कवठा, येरंडी/देव, परसोडी, डोंगरगाव, भिवखिडकी, नवेगावबांध, खोली, पांढरवाणी/माल, पांढरवाणी रैय्यत या गावांनी सादर केला.
सन २०१३ मध्ये अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत कोहलगाव, रांजीटोला, येलोडी, जांभळी, कान्होली, कान्होलीसोनार, जंभारखेडा, येरंडी व माहुली या गावांनी बंदीचे प्रस्ताव शासनाला सादर केले.
यापैकी रामपूर, पवनी/धाबे, येरंडी/दर्रो व माहुली अशा चार गावांनी नक्षल गावबंदीने पुन्हा प्रस्ताव सादर केले. (तालुका प्रतिनिधी)
३१ गावांना मिळाली मदत
नक्षल गावबंदी करणाऱ्या गावांना शासनातर्फे तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील ४७ पैकी ३१ गावांना ३लाख रुपये मंजूर करण्यात आले. यातील सुकडी, येडमागोंदी, डुंबरटोला, बंजारी, दलदलकुही, टोयागोंदी, डहाराटोला, वारकरीटोला, कोटरा, सिंगाटोला, करणूटोला, नवाटोला, हलबीटोला, कलारटोला, शिलापूर या गावांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर कोसबी, कोकणा/जमी., सिरपूरबांध, वडेगाव, सालेगाव, खांबतलाव, धाबेटेकडी, तिडका, चान्ना/कोडका, कवठा, येरंडी देव, परसोडी, डोंगरगाव, खोली, पांढरवाणी माल, पांढरवाणी रय्यत या गावांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात आले असून उर्वरीत ५० हजार रुपये नंतर दिले जाणार आहे. या रकमेतून गावातील विकास कामे ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली आहे.

Web Title: Naxalites get 'ban' in 47 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.