क्षेत्राचा विकास हेच माझे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:30 PM2019-02-17T22:30:39+5:302019-02-17T22:30:59+5:30

कालच ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याता योगायोगाने आज माझा वाढदिवस असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर आर्शिवाद दिला हे महत्वपूर्ण आहे. मात्र जे प्रेम व जबाबदारी आपण आम्हाला सोपविली त्यांना आम्ही किती निभावू हे त्यापेक्षा महत्वपूर्ण आहे.

My goal is development of the area | क्षेत्राचा विकास हेच माझे ध्येय

क्षेत्राचा विकास हेच माझे ध्येय

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सव, आज समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कालच ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याता योगायोगाने आज माझा वाढदिवस असून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर आर्शिवाद दिला हे महत्वपूर्ण आहे. मात्र जे प्रेम व जबाबदारी आपण आम्हाला सोपविली त्यांना आम्ही किती निभावू हे त्यापेक्षा महत्वपूर्ण आहे. जीवनात सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली असून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती व क्षेत्राचा विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्यावतीने गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकास व प्रगतीच्या कामनेतून आयोजीत ‘नानीबाई का मायरा’ कथा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१७) ते उपस्थितांना संबोधीत करताना बोलत होते.
याप्रसंगी वर्षा पटेल यांनी स्वत: जयाकिशोरी यांचे कथास्थळाच्या द्वारावर जावून स्वागत केले. तर प्रफुल्ल पटेल-वर्षा पटेल, राजेंद्र जैन-सुनिता जैन यांच्यासह खासदार मधुकर कुकडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, दामोदर अग्रवाल, राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, नरेश माहेश्वरी, चेतन बजाज, सिताराम अग्रवाल, हुकुमचंद अग्रवाल, राजेंद्र माहेश्वरी, गोविंद अग्रवाल, साजनदास वाधवानी, लख्मीचंद रोचवानी, गोवर्धनदास अग्रवाल, अ‍ॅड. इंद्रकुमार होतचंदानी, सुनील पृथ्यानी, जय चौरसिया, जयेश पटेल, चंद्रेश माधवानी, कुमार पलन, निलेस चौबे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आरती ओवाळून पूजन करून जयकिशोरी यांचे स्वागत केले. तर अर्चिता तिवारी या विद्यार्थिनीने कत्थक नृत्य सादर करून जयाकिशोरी यांचे स्वागत केले.
प्रास्तावीकातून राजेंद्र जैन यांनी, ‘नानीबाई का मायरा’साठी त्यांची विनंती स्वीकारल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानले. तसेच कथेचा सोमवारी (दि.१८) समारोप होणार असल्याचे दुपारी २ वाजतापासून कथा सुरू होणार असल्याचे सांगीतले.
 

Web Title: My goal is development of the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.