वैद्यकीय अधीक्षकांचे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन?

By Admin | Published: May 23, 2015 01:46 AM2015-05-23T01:46:48+5:302015-05-23T01:46:48+5:30

स्थानिक बाई गंगाबाई महिला रूग्णालयात कार्यरत दोन महिला वैद्यकीय अधिकारी व दोन महिला तंत्रज्ञ यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके हे लालफितशाहीचा धाक दाखवून वात्रट वर्तणूक व शोषण करतात,

Medical Superintendent abused women employees? | वैद्यकीय अधीक्षकांचे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन?

वैद्यकीय अधीक्षकांचे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन?

googlenewsNext

आरोग्य विभागात खळबळ : चार महिला कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार
गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रूग्णालयात कार्यरत दोन महिला वैद्यकीय अधिकारी व दोन महिला तंत्रज्ञ यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके हे लालफितशाहीचा धाक दाखवून वात्रट वर्तणूक व शोषण करतात, अशी तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बाई गंगाबाई महिला रूग्णालय हे जिल्ह्यातील महिला रूग्णांसाठी एकमेव शासकीय रूग्णालय आहे. मात्र अशा प्रकाराने येथे रूग्ण तर दुरच महिला कर्मचारीदेखील सुरक्षित नाही, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. येथील ढिसाळ आरोग्य सेवा व रूग्णालयाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र आता महिला वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचारी अशा चौघींनी पुढाकार घेवून येथे महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याची तक्रार आपल्या वरिष्ठांकडे केली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके अभद्र भाषेत व्यवहार करतात. पदाचा धाक दाखवून कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून नोकरी धोक्यात आणण्याची धमकी देतात. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत जावून अशोभनिय व्यवहार करतात.
या प्रकारांचा विरोध केला तर उलट-सुलट आरोप करून वरिष्ठांना तक्रार करतात, आदी बाबींचा तक्रारीत समावेश आहे.
सदर तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह आरोग्य विभागाचे मंत्री व संचालकांकडेही पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी तक्रारीची दखल घेवून त्या चारही कर्मचाऱ्यांना बोलावून शहानिशा करणे सुरू केले आहे.
त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांच्यावर कोणती कारवाई होते? प्रकरण पुढे तापणार काय? याकडे आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने महिला कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
दोडके यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले
सदर प्रकाराबाबत गंगाबाई महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पहिला कॉल रिसिव्ह केला, मात्र सदर प्रतिनिधीने या प्रकरणाबाबत विचारणा करताच ‘नो कॉमेन्ट्स’ असे शब्द उच्चारून त्यांनी फोन कापला. यानंतर पुन्हा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.
निलंबनाची मागणी
महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकाच्या असभ्य वर्तणुकीचे प्रकरण समोर आणले आहे. या तक्रारीची त्वरित दखल घेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गजभिये यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

Web Title: Medical Superintendent abused women employees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.