कृष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:54 PM2018-09-19T21:54:40+5:302018-09-19T21:54:55+5:30

जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.०८) आहे. म्हणून कुष्ठरु ग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरु ग्ण शोध अभियान २४ सप्टेबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

Make Awareness Public awareness campaign successful | कृष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करा

कृष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करा

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : २४ सप्टेबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान शोध मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.०८) आहे. म्हणून
कुष्ठरु ग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरु ग्ण शोध अभियान २४ सप्टेबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्ठरोग शोध अभियानाबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे उपस्थित होते.
या वेळी बलकवडे यांनी कुष्ठरोग सहायक संचालक डॉ.आर.जे.पराडकर यांच्याकडून या अभियानाबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसेवक यांच्यामार्फत प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांचे त्वचा रोग तपासणी करण्यात येणार आहे.
महिला सदस्यांची तपासणी आशा वर्कर मार्फत व पुरु ष सदस्यांची तपासणी चमू पुरु ष स्वयंसेवक यांचेमार्फत करण्यात येणार आहे. दयानिधी यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये दैनंदिन प्रतिज्ञेच्यावेळी कुष्ठरु ग्ण शोध अभियानाबाबत गावातील स्थानिक आरोग्याशी संबंधीत कर्मचाºयांमार्फत कुष्ठरु ग्णाविषयी व या मोहिमेबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या. आठवडी प्रभातफेरीच्या दिवशी सदर मोहिमेबाबत घोषणा देण्याच्या सूचना दिल्या.
गावपातळीवरील आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत गावातील सर्व नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. सदर कार्यक्र म राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक, शासकीय निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, प्रसारमाध्यमे, शाळा महाविद्यालय विद्यार्थी यांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला घरी तपासणीसाठी आलेल्या चमुला सहकार्य करु न सदर अभियान यशस्वी बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Make Awareness Public awareness campaign successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.