लिटरमागे ५ रूपयांनी लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:46 AM2018-04-21T00:46:42+5:302018-04-21T00:46:42+5:30

शेतकऱ्यांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकऱ्यांनी सुरू केला. मात्र त्या शेतकºयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने लुबाडणूक सुरू केली आहे.

Looter behind 5 liters | लिटरमागे ५ रूपयांनी लुबाडणूक

लिटरमागे ५ रूपयांनी लुबाडणूक

Next
ठळक मुद्देदुग्ध उत्पादक शेतकऱ्यांत असंतोष : दिवसाला ४४ हजार रूपये संस्थेच्या गल्ल्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकऱ्यांनी सुरू केला. मात्र त्या शेतकºयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने लुबाडणूक सुरू केली आहे. याबाबत विभागीय उपनिबंधक (नागपूर) व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. ही संस्था एका दिवसात शेतकऱ्यांचे ४० ते ५० हजार रूपये हडपत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेंंतर्गत जिल्हा दुग्ध संकलन करणाºया संस्था १५० च्या घरात आहेत. या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार शेतकरी जुळले आहेत. या शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था करीत असल्याची तक्रार ५ एप्रिल रोजी करण्यात आली आहे. ज्या दुधाचे फॅट ३.५ आहे त्या दुधाला शासकीय दर २७ रूपये ५० पैसे आहे. हा दर शासकीय नियमाप्रामाणे द्यायला हवा. परंतु जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने १ डिसेंबर २०१७ पासून एक लीटर दुधामागे ५ रूपये ५० पैसे कमी देऊन फक्त २२ रूपये दराने शेतकºयांना पैसे दिले. म्हणजेच एका लीटर मागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात ८ हजार लीटर दुधाचे संकलन गोंदिया व कोहमारा या दोन संकलन केंद्रावर होते. म्हणजेच एका दिवसाचे शेतकºयांचे ४४ हजार रूपये येथील जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कमी देत आहे. मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. २४ जानेवारी पासून हा प्रकार सुरू असल्याने जानेवारी महिन्याचे ८ दिवस, फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस, मार्च महिन्याचे ३१ दिवस व एप्रिल महिन्याचे २० दिवस असे एकूण ८७ दिवसांत गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने शेतकºयांचे ३८ लाख २८ हजार रूपये हडपले आहेत. या संदर्भात आनंद दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. हरसिंगटोला, संतराम दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. लोहारा, किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. सेजगाव, एबेनेझर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. साईटोला, कन्हान महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. साईटोला व सिबा महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. रतनारा जि. गोंदिया. यांनी जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे.

शेतकऱ्यांना मिळतात धमक्या
गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व उपनिबंधकाकडे केली असता त्या शेतकऱ्यांना धमकी दिली जात असल्याचे आनंद दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. हरसिंगटोलाचे मन्साराम दसरे, संतराम दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. लोहारचे संचालक परस बसेने, किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. सेजगावचे खेमराज राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. तुम्हाला दूध द्यायचे असेल तर द्या, अन्यथा बंद करा अशी तंबी शेतकºयांना देण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांशी संगनमत
गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची दुग्ध विकास अधिकारी (भंडारा) यांच्याशी साठगाठ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रार देऊनही कारवाई केली जात नाही. जानेवारी महिन्यात तक्रार करण्यात आली तरीही अधिकारी कारवाई करीत नाहीत, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

दूधाचे दर शासकीय दरापेक्षा कमी मिळत असल्याची तक्रार संस्थांकडून आली व त्याची उपनिबंधक चौकशी सुरू आहे. गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेला ७९ (अ) प्रमाणे नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविले आहे. कारवाई निश्चीत होईल.
निलेश बंड
दुग्ध विकास अधिकारी, भंडारा.

Web Title: Looter behind 5 liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.