Lok Sabha Election 2019; एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 08:37 PM2019-03-26T20:37:15+5:302019-03-26T20:37:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक ...

Lok Sabha Election 2019; No voter should be deprived of voting | Lok Sabha Election 2019; एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये

Lok Sabha Election 2019; एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : अधिकाऱ्यांची बैठक, चुका टाळण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापासून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांसह जिल्ह्यातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आयोजित बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.२५) आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी आचारसंहिता अंमलबजावणी आणि स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड (तिरोडा विधानसभा क्षेत्र), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी (आमगाव विधानसभा क्षेत्र), नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव (गोंदिया विधानसभा क्षेत्र), प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.व्ही.नैनवाड (अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाºया दोन लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. मतदान केंद्रावर सर्वप्रकारच्या मतदारांना आवश्यक त्या सोयी-सुविधा व अन्य बाबीसाठी समन्वय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. समन्वय अधिकारी यांना नेमून देण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहे की नाही याची प्रत्यक्ष भेट देवून खात्री करावी. काही सुविधा मतदारांना मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयावयाचे असल्याने त्याचे सुक्ष्म नियोजन आतापासूनच करावे. मतदान केंद्रनिहाय विवरणपत्रात अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना सादर करावयाचा असल्याने त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
ज्या ठिकाणी दिव्यांग मतदार आहेत त्यांना व्हीलचेअरच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेच्या सहकार्याने घरुन मतदानासाठी आणणे व त्यांना परत घरी सुखरुप पोहोचवून देण्याची जबाबदारी पार पाडावी. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्सची व्यवस्था करण्यात यावी.अंध मतदारांना देखील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु न दयाव्या. शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था देखील मतदान केंद्रावर असली पाहिजे. औषधोपचाराची प्राथमिक सुविधा देखील प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करुन दयाव्यात. पुरुष व महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करण्यात यावा. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात किमान एका मतदान केंद्रात संपूर्ण निवडणूक प्रक्रि या ही महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत कार्यान्वीत करावी, त्यामुळे महिला मतदार मतदानासाठी प्रोत्साहित होतील असे सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2019; No voter should be deprived of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.