Lok Sabha Election 2019; ईव्हीएमचे पहिल्या टप्प्यात सरमिसळीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 08:31 PM2019-03-26T20:31:50+5:302019-03-26T20:34:43+5:30

येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

Lok Sabha Election 2019; Intermittent in the first phase of EVM | Lok Sabha Election 2019; ईव्हीएमचे पहिल्या टप्प्यात सरमिसळीकरण

Lok Sabha Election 2019; ईव्हीएमचे पहिल्या टप्प्यात सरमिसळीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (दि.२५) नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात असलेल्या प्रसारमाध्यम कक्षात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समोर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनचे पहिल्या टप्प्यात संगणकाच्या माध्यमातून सरमिसळीकरण करण्यात आले.
विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापराबाबत मनात शंका ठेवू नये. निवडणूक प्रक्रि या ही अत्यंत पारदर्शकपणे केली जाते. या प्रक्रि येमध्ये राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाते. ईव्हीएम बाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यात येते. संगणक प्रक्रि येच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचे सरमिसळीकरण करण्यात येत असल्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्या मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जाणार आहे हे सांगता येणार नाही.
जिल्ह्यात गोंदिया आणि अर्जुनी/मोरगाव येथील प्रत्येकी एक मतदान केंद्रावर १४०० पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे दोन आणखी मतदार केंद्राची आवश्यकता आहे. या दोन मतदान केंद्राला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव विधानसभा मतदारसंघ येतो. आमगाव विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्र येतात. त्यासाठी ३१० बॅलेट युनिट मंजूर असून राखीव २५ टक्के म्हणजे ७९ बॅलेट युनिट, असे एकूण ३८९ बॅलेट युनिट, आमगाव मतदारसंघासाठीच ३१० कंट्रोल युनिट व २५ टक्के राखीवमध्ये ७९ कंट्रोल युनिट आणि ३१० मतदान केंद्रासाठी ३१० व्हीव्हीपॅट मंजूर असून ३२ टक्के म्हणजे १०० व्हीव्हीपॅट मशीन अशा एकूण ४१० व्हीव्हीपॅट मशीन आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ३१६ मतदान केंद्रासाठी ३१६ बॅलेट युनिट मंजूर असून १७ टक्के राखीव म्हणजे ५७ बॅलेट युनिट, असे एकूण ३७३ बॅलेट युनिट, ३१६ कंट्रोल युनिट मंजूर असून १७ टक्के राखीव म्हणजे ५७ कंट्रोल युनिट, असे एकूण ३७३ कंट्रोल युनिट मतदान केंद्रासाठी तर ३१६ व्हीव्हीपॅट मशिन मंजूर असून, २८ टक्के राखीव व्हीव्हीपॅट असून ती संख्या ९० आहे. असे एकूण ४०६ व्हीव्हीपॅट मशिन अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३६० मतदान केंद्रासाठी ३६० बॅलेट युनिट मंजूर असून १७ टक्के राखीव म्हणजे ६३ बॅलेट युनिट, असे एकूण ४२३ बॅलेट युनिट मंजूर आहे. ३६० कंट्रोल युनिट मंजूर असून १७ टक्के राखीव ठेवण्यात आले असून ही संख्या ६३ कंट्रोलची आहे. या विधानसभा क्षेत्रासाठी ४२३ कंट्रोल युनिट लागणार आहे. तर ३६० व्हीव्हीपॅट मंजूर असून २७ टक्के म्हणजे ९९ व्हीव्हीपॅट राखीव राहणार आहे. ही व्हीव्हीपॅटची संख्या एकूण ४५९ इतकी राहील. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील २९५ मतदान केंद्रासाठी २९५ बॅलेट युनिट मंजूर असून त्यामध्ये राखीव १७ टक्के म्हणजे ५१ बॅलेट युनिट राखीव राहणार असून एकूण ३४६ बॅलेट युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे.
याच मतदारसंघासाठी २९५ कंट्रोल युनिट मंजूर असून १७ टक्के म्हणजे ५१ कंट्रोल युनिट राखीव राहणार आहे. असे एकूण ३४६ कंट्रोल युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे. तर २९५ व्हीव्हीपॅट मंजूर असून २७ टक्के राखीव म्हणजे ८० व्हीव्हीपॅट असतील. तर एकूण ३७५ व्हीव्हीपॅट यंत्राचा पुरवठा या मतदारसंघासाठी करण्यात येणार आहे. पहिल्या पातळीवर करण्यात आलेल्या सरमिसळीकरणानंतर ईव्हीएम मशीन, सीपीयु मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन मतदारसंघनिहाय तेथील स्ट्राँग रुमला पाठविण्यात येणार आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2019; Intermittent in the first phase of EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.