दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:32 PM2018-09-06T21:32:02+5:302018-09-06T21:34:45+5:30

दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Keep the viewpoint of Divya positive | दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा

दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा

Next
ठळक मुद्देरामदास आठवले : दिव्यांग मेळावा : २३१७ दिव्यांगांना साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील आयटीआय सभागृह येथे आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्य उपकरणे वितरण कार्यक्र मात ते बोलत होते. याप्रसंगी ना. रामदास आठवले व ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरुपात विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबरअली, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनाडे, पं.स.सभापती गिरिधर हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एलिम्को कंपनीचे उपमहाव्यवस्थापक अजय चौधरी व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. आठवले म्हणाले, मागील चार वर्षात केंद्र सरकारने देशभरात ७ हजार शिबिर घेवून १० लाख दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप केले.
दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलण्याची गरज आहे. दिव्यांगाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजित आजचा साहित्य वाटप कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. हे साहित्य वाटप प्रातिनिधीक स्वरु पात असले तरी जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती साहित्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
दिव्यांग बांधवाच्या विकासासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा निर्णय शासन घेत आहे. दिव्यांगासाठी विभागीय स्तरावर सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र व विशेष आयटीआय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगाना सहाशे
रु पयांऐवजी हजार रु पये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बडोले यांनी या वेळी दिली. कायम विना अनुदानित मधील कायम हा शब्द वगळण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी महाराष्ट्रात दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अंध व दिव्यांग मुलांच्या स्वागतगीताने करण्यात आले.

विविध साहित्यांचे वाटप
या मेळाव्यात दिव्यांगाना २८ मोटराईज्ड ट्रायिसकल, ६५८ ट्रायिसकल, ३४७ फोल्डींग व्हील चेअर, २० सि.पी.चेअर, ९५४ बैसाखी, ४६३ वाकिंग स्टिक, ११ बेल किट, ९ ब्रेल केन, १०१ स्मार्ट केन, ५०० श्रवणयंत्र, ४४७ एमएसआयडी किट, ३६ रोलेटर, २५ एडीएल किट, १९ डेजी प्लेअर, ३५९ कृत्रिम अंग आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कायद्यात कुठलाही बदल नाही
एसटी, एससी अ‍ॅक्ट संशोधनाविरोधात गुरुवारी (दि.६) सवर्णातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता, त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Keep the viewpoint of Divya positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.