मानेगावात काळविटांचे दर्शन

By admin | Published: February 3, 2017 01:30 AM2017-02-03T01:30:25+5:302017-02-03T01:30:25+5:30

वन्यप्राण्यांत ‘शेड्यूल वन’ मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे.

Kalavitt's view of Managaga | मानेगावात काळविटांचे दर्शन

मानेगावात काळविटांचे दर्शन

Next

तयार झाले पर्यटनस्थळ : ग्रामवनासाठी नागरिकांचे प्रयत्न
नरेश रहिले   गोंदिया
वन्यप्राण्यांत ‘शेड्यूल वन’ मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यांच्या मधातल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काळविटांची संख्या १५० पेक्षा अधिक आहे. त्यातल्या त्यात मानेगाव परिसरात काळवीट व चितळांची संख्या जास्त आहे. त्यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी मानेगावात निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे.
वन्य जीवांमध्ये आकर्षित करणारा काळविट प्राणी राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळविट वन्यप्राण्यासाठी महत्वाचा आहे. येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येत होते. परंतु वन्यप्रेमी व वनाधिकाऱ्यांच्या सकारात्मक पुढाकाराने माळरानावर कुरण वाढविण्याचे काम सतत सुरू आहे. परिणामी काळविटांची संख्या वाढू लागली आहे.
काळविटच्या संवर्धनासाठी वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी. पवार, क्षेत्र सहाय्यक एल.एस. भुते, वनरक्षक डी.आर. राठोड व नमजूर बी.आर. भेलावे, एन.डी. सोनावाने यांनी विशेष प्रयत्न केले.
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. उजाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत असल्याने मानेगावातील माळरानावर काळविट व चितळांचे सवंर्धन होत आहेत. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता १५० ते १८० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असल्याने आता नागरिकांना व पर्यटकांना त्याचे दर्शन व्हावे यासाठी मानेगावात पर्यटन स्थळ तयार करण्यात आले.
काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता. या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर दुष्यंत आकरे, चेतन जसानी, बबलु चुटे, प्रवीण मेंढे, विवेक खरकाटे केल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचे अधिवास टिकून आहे. सध्याचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर याचे उजाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले. बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले. सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला.

हालचाली टिपण्यासाठी वॉच टॉवर
काळविटाबरोबर कुरणावर वावरणाऱ्या लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाऱ्या लांडग्यांची संख्या आता बरीच झाली आहे. या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाटी वनविभागाने वॉच टॉवर उभारला आहे. त्या टॉवरवरून त्यांच्यावर नजर ठेवली जाते. चितळ, काळविट, लांडगे, निलगाय यासारखे प्राणी या जंगलात आहेत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी २ सोलर पंप, दोन सिमेंट बंधारे, दोन नैसर्गिक तलाव आहेत.

Web Title: Kalavitt's view of Managaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.