केवळ गोड बोलून कामे होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:06 AM2018-04-15T00:06:19+5:302018-04-15T00:06:19+5:30

It does not just work smoothly | केवळ गोड बोलून कामे होत नाही

केवळ गोड बोलून कामे होत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : चार वर्षात विकास कुठे ?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील भाजप सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यानंतर या सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. सर्व सामान्यांसाठी केवळ मोठ्या मोठ्या घोषणा करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. तर मुख्यमंत्री केवळ गोड बोलतात मात्र प्रत्यक्षात काही कृती करित नसल्याने विकास कामे रखडली आहे. केवळ गोड बोलून होत नाही तर त्याला कृतीची जोड द्यावी लागते अशी टिका खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.१४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला माजी.आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी उपस्थित होते.
खा. पटेल म्हणाले, शासनाने आत्तापर्यंत जेवढ्या योजनांची घोषणा केली. त्यापैकी एकही योजना सुरळीतपणे सुरू नाही. शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची देखील तिच स्थिती आहे.
शेतकरी कर्जमाफीतील घोळ अद्यापही संपलेला नसून आत्तापर्यंत केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देणाºया केंद्र व राज्यातील सरकारने सांगता येईल असे एकही काम केले नाहीे. मागील चार वर्षांत गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली. एकही नवीन उद्योग स्थापन करण्यात आला नाही. हे सरकार केवळ घोषणाबाज असल्याचा आरोप पटेल यांनी केला.
एमआयटी बंद करण्याचे दुख:च
मागील काही दिवसांपासून येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (एमआयटी) बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. देशपातळीवरील अभियांत्रिकी महाविद्यालय असलेले हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय काही तांत्रिक अडचणीमुळे जड अतंकरनाने घ्यावा लागत आहे. हे महाविद्यालय बंद व्हावे अशी आपली मुळीच इच्छा नाही. मोठ्या मेहनतीने आणि दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी हे महाविद्यालय सुरू केले. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यामुळेच या महाविद्यालयाचा सर्वत्र लौकीक सुध्दा आहे. मात्र आता काही तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याने व प्रवेशांची संख्या कमी झाल्यानेच हा निर्णय घ्यावा लागत आहे. याचे मला मनापासून दुख: होत असल्याचे पटेल यांनी सांगितले.

Web Title: It does not just work smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.