सामान्य कार्यकर्त्यांच्या लढाईत मी सोबत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:22 PM2018-03-04T21:22:48+5:302018-03-04T21:22:48+5:30

मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे.

I am with the fight against the common party workers | सामान्य कार्यकर्त्यांच्या लढाईत मी सोबत आहे

सामान्य कार्यकर्त्यांच्या लढाईत मी सोबत आहे

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : प्रताप लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. या प्रवासात अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरीही मी एकनिष्ट कार्यकर्ता म्हणून निरंतर काम पाहत आहे. जिल्हा परिषदेपासून नगर परिषदेपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. काँग्रेसची निती व आत्मसन्मानासाठी कधीच झुकलो नाही. सामान्य कार्यकर्त्याच्या लढाईत मी सोबत असल्याचे उद्गार आ. गोपालदास अग्रवाल यांनी काढले.
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येथील प्रताप लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, पन्नालाल शहारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, माजी आ. रामरतन राऊत, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अ‍ॅड. के.आर. शेंडे, पी.जी. कटरे, राकेश ठाकूर, राजेश नंदागवळी, माधुरी हरिणखेडे, पं.स. सभापती राऊत सालेकसा, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे अर्जुनी मोरगाव, सीमा अटरे, विमल नागपुरे, विजय लोणारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, उषा शहारे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अशोक लंजे, नामदेव किरसान, अशोक चौधरी, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरीपुंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, वासुदेव चुटे, धनलाल ठाकरे, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, महेंद्र पुरोहित, सुनील तिवारी, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, शिलू चव्हाण, क्रांतीकुमार जायस्वाल, दिपीका रुसे, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंगक पाथरु, विशाल शेंडे, अमर वऱ्हाडे, निलम हलमारे, धिरज नशिने, विक्की गोहरे, आनंद तुरकर, धम्मानंद मेश्राम, रत्नदिप दहिवले, जहीर अहमद, जितेंद्र कटरे, कुरमराज चव्हाण, नितीन पुगलिया, रुखसाना सैय्यद, कैलास अग्रवाल, योजना कोतवाल, अ‍ॅड. पी.सी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी कृउबास सभापती चुन्नी बेंद्रे, सडक अर्जुनीच्या माजी सरपंच उषा खोटेले, देवरीचे सेवानिवृत्त आयुक्त अनिल कुंभरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी नाना पटोले यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, सहेसराम कोरोटे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, माजी आ. रामरतन राऊत, माजी मंत्री भरत बहेकार यांनी आपले विचार व्यक्त केले. सोबत आ. गोपालदास अग्रवाल व माजी खा. नाना पटोले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन कार्यकर्त्यांना एकत्र येवून समस्यांना पेलण्याचे आवाहन केले. संचालन अपूर्व अग्रवाल तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.
असक्षम चौकीदारामुळे लुटारुंचे पलायन-पटोले
देशाचा चौकीदार म्हणून स्वत:ला म्हणून घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोळ्यासमोरुन निरव मोदी व रोटेमॅक पेन कंपनीचे मालीक कोठारी पलायन झाले. परंतु ज्या गरीबांचे पैसे बँकेत आहेत त्यांच्यावर डाका टाकण्याचा काम चौकीदार करीत आहे. देशाला लुटणारे डोळ्यासमोरुन पळून जातात. मात्र देशाचे मुख्य लोक झाडू लावण्यात व्यस्त असल्याचे टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. भारताचा एक सैनिक शहीद झाला तर पाकचे दहा जणांचे मुंडके कापून आणू, असे सांगणारे मोदी पाकीस्तानच्या प्रधानमंत्र्यांसोबत बिरियानी खायला जातात आणि याचा फायदा चिन घेतो. फक्त गोड बोलून जनतेला जास्त दिवस भ्रमित करता येत नाही. वेळ आल्यावर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे माजी खा. नाना पटोले म्हणाले.

Web Title: I am with the fight against the common party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.