आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 09:47 PM2019-02-03T21:47:07+5:302019-02-03T21:47:29+5:30

राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

The history of tribal society is bravery and valor | आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम गर्रा येथील आदिवासी जागृती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम गर्रा येथे शनिवारी (दि.२) गोंडवाना आदिवासी समितीच्यावतीने आयोजीत आदिवासी संस्कृती भाषा, साहित्य व सद्भावना जागृती संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सरकारसोबत लढा दिला. तर दुसरीकडे मागसलेल्या व उपेक्षीत आदिवासी समाजात जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. जल, जमीन व जंगलासाठी आदिवासी समाजाला उभे करून त्यांना आपल्या अधिकारांप्रती जागरूक केले. हेच कारण आहे की, आज अवघ्या जगात त्यांना देवाचा दर्जा मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या आदर्शांंतून पे्ररणा घेत आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहोत. विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाच्या विकासासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही लढलो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या सर्व योजना आमच्या माध्यमातून आणून समाजाला पुढे आणण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे अतिरीक्त कार्यालय आम्ही गोंदियात सुरू करविले. भविष्यातही आम्ही आपल्या प्रयत्नांत कमी पडणार नसल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य विजय लोणारे, सरपंच डिलेश्वरी येडे, उपसरपंच निर्मला ठाकरे, जी.एस.बरडे, अंकेश हरिणखेडे, मनिष मेश्राम, सुनील राऊत, कल्पना बागडे, राजेश भोयर, सुरेश कुंभरे, श्रीराम टेकाम, धनलाल टेकाम, गुलाब पंधरे, रामकृष्ण पंधरे, राजेश पंधरे, महेश मरसकोल्हे, हिरालाल पंधरे, दारासिंग कुंजाम, विजय पंधरे, तिलकचंद टेकाम, मनोद उईके, भूमेश्वर पंधरे, संजय कोडवानी, उमेश टेकाम, बुधा पंधरे, हौसलाल पंधरे, खेमलाल पंधरे यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.

कॉँग्रेस सरकारने दिला सन्मान
कॉँग्रेस सरकारने रानी दुर्गावती यांच्या नावाने जबलपूर विश्व विद्यालयाचे नाव ठेवले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसच्या केंद्र सरकारने जून १९८८ मध्ये टपाल तिकीट जारी केले. जबलपूर येथून सुटणाºया जम्मूतवी रेल गाडीला रानी दुर्गावती यांच्या सन्मानार्थ दुर्गावती एक्स्प्रेम म्हणून नाव देण्यात आले. तर बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ राची विमानतळ व पुरलिया विश्व विद्यालयाचे नाव भगवान बिरसा मुंडा यांच्या नावावर ठेवण्यात आले. देशातील आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा व रानी दुर्गावती यांच्या शौर्याला कॉँग्रेस सरकारने सन्मान देण्याचे कार्य केल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

Web Title: The history of tribal society is bravery and valor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.