हे सरकार विश्वासघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 09:50 PM2017-12-23T21:50:11+5:302017-12-23T21:50:38+5:30

केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे.

This government is treacherous | हे सरकार विश्वासघाती

हे सरकार विश्वासघाती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात विकास कोसो दूर आहे. रस्ते तयार करण्यासाठी व खड्डे बुजविण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण, रस्ते सोडा साधे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्टÑवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी येथे केली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सडक-अर्जुनी येथील त्रिवेणी हायस्कूलच्या पटागंणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, जि.प.सदस्य रमेश ताराम, किसान सभा अध्यक्ष एम. आर. टी. शहा, जीवनलाल लंजे, माजी पं.स.सभापती वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य नरेश भेंडारकर, मिलन राऊत, माजी नगराध्यक्ष शिव शर्मा, महिला आघाडी अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, रजनी गिऱ्हेपुंजे, जि.प. सदस्य कैलास पटले, माजी नगराध्यक्ष गिता लांजेवार, माजी जि.प. सदस्य प्रभुदयाल लोहिया, शिवाजी गहाणे, छाया चव्हाण, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, दिनेश कोरे, उमराव मांढरे, सुखदेव कोरे, ईश्वर कोरे उपस्थित होते.
ना.पटले म्हणाले, यंदा गोंदिया जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर शेती पावसाअभावी पडीक राहिली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली त्यांना २५ हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी. सरकारने धानाला प्रती क्विंटल २०० बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप पटेल यांनी केला. राज्य व केंद्रातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: केली नसून हे सरकार शेतकरी विरोधी व फसवे असल्याचा आरोप केला. चंद्रीकापुरे म्हणाले, शेतकºयांच्या समस्या फार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी आमच्यासोबत शेतकºयांनी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन केले. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खा. प्रफुल पटेल यांनी सभा घेण्यासाठी पाच दिवस वेळ देण्याची मागणी केली. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अविनाश काशिवार यांनी केले तर आभार छाया चव्हाण यांनी मानले.
कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश
खा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मुद्दावरुन सरकारवर कडाकडून टिका केली. या फसव्या सरकाला धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. गावा गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडणविण्याचे आवाहन केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते.

Web Title: This government is treacherous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.