समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:23 PM2018-04-25T20:23:17+5:302018-04-25T20:23:17+5:30

देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत.

Government failures to solve the problem | समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : चुल्हाडात काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची बेहाल करणाºया एनडीए व युतीचे शासनाला मावा, तुडतुडा लावण्यासाठी कंबर कसून सज्ज राहण्याचे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
चुल्हाड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले होते. अतिथी म्हणून माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश सचिव ढेंगे, आशावरी देवतळे, प्रमोद तितीरमारे, के.के. पंचबुध्दे, शिवलाल नागपुरे, डॉ. पंकज कारेमोरे, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे, मोहाडीचे तालुकाध्यक्ष प्रभु मोहतुरे,तालुकाध्यक्ष शंकर राऊत, बंडु चौरीवार, सहादेव तुरकर, मधुकर लिचडे मंचावर उपस्थित होते.
आ.वड्डेटीवारम्हणाले, राज्यात उंदिर घोटाळा सुसुंदरीने उघडकीस आणला. पंरतु पुढील कारवाईकरिता समोर आली नाही. राज्यात उद्योगपतीचे भले करण्यात शासन व्यस्त आहे. शेतकरी मदतीपासुन वंचित आहे. बेरोजगारी गंभिर समस्या असून वाढत्या बलात्काराचे घटनावर सरकारचे मंत्री बेताल व्यक्तव्य करीत आहे.
या सरकारला आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत सर्व सामान्य जनतेचे शासन आणण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकटीकरिता कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे.
या मेळाव्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी व पचांयत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत विजय वड्डेटीवार आणि नाना पटोले यांनी केले. प्रास्ताविक सादर करतांना रमेश पारधी म्हणाले, राज्य शासन जनतेला उपेक्षीत करीत आहेत. शेतकरी, कष्टकरी बांधवाचे वाढत्या समस्या आहे. थ्रीफेज विज पुरविण्यात या सरकारचे काळात एक सेकंद ही वाढ करण्यात आली नाही.
राजीव सागर धरणाचे पाणी चांदपुर जलाशयात सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गरीबांना चटके देणाºया सरकारचे निषेध करीत भाजप पक्ष सोडण्याची घोषणा केली. यावेळी कलाम शेख यांनी नेतृत्वाचा खरपुस समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार नाना पटोले, बंडु सावरबांधे, प्रभु मोहतुरे यांनी संबोधीत केले. काँग्रेस पक्षात भाजप हा रामराम ठोकून ६०० कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.
यात चुल्हाडच्या सरपंच शिला चौधरी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश पारधी, सतिष पटले, विलास खरवडे, बपेराचे माजी पंचायत समिती सदस्य अजय खंगार, भाजप दलीत आघाडीच्या अध्यक्षा साधना वालदे, अनिल खंगार, देवसर्राचे माजी उपसरपंच कटरे, गोंडीटोलाचे सरपंच नंदलाल रहांगडाले, किशोर रहांगडाले, महालगावचे योगेश चौरे, पारपिंडकेपारचे माजी सरपंच ओमकांत बुरडे, मोहाडी खाणचे सरपंच सुनिल माने, अंबादास कानतोडे, कुवर बुध्दे, गोंदेखारीचे अर्जुन राणे, बिनाखीचे सरपंच कविता बघेले, भाजप बुध कमीटीचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम तथा देवरी (देव), सुकडी (नकुल), टेमनी, चांदपुर, मांगली गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट काँग्रेसाशी झाला.
आयोजित मेळाव्याचे संचालन शंकर राऊत, रामेश्वर मोटघरे यांनी केले. तर आभार रमेश पारधी यांनी केले.

Web Title: Government failures to solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.