मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:23 PM2019-02-10T21:23:54+5:302019-02-10T21:24:48+5:30

महिलांसाठी आज कायदे असले तरीही त्या सुरक्षीत नाहीत. यासाठी महिला व मुलींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटे व मुलांना पराटे शिकविण्याची गरज आहे. करिता मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्ता सविता बेदरकर यांनी केले.

Girls should be self-reliant to protect themselves | मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे

मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे

Next
ठळक मुद्देसविता बेदरकर : सोनपुरी येथील जि.प.प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपुरी : महिलांसाठी आज कायदे असले तरीही त्या सुरक्षीत नाहीत. यासाठी महिला व मुलींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटे व मुलांना पराटे शिकविण्याची गरज आहे. करिता मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्ता सविता बेदरकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.६) मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच राखी ठाकरे होत्या. उद्घाटन मिरा जैतवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भानपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आर.डी.पटले, के.यू.ठाकूर, तंमुस अध्यक्ष गणराज धुवारे, पोलीस पाटील राजू ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चौरागडे, उपाध्यक्ष कविता पटले, सर्व सदस्य , ग्रा.पं.चे सर्व सदस्य, उपसरपंच राजू पटले, लेखराम ठाकरे, आडकन तुरकर, दशरथ पटले, पी.एस.पटले, ठाकरे व सर्व शिक्षक उपस्थित होते. तसेच गावातील सर्वच समित्यांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या छायाचित्राला माल्यार्पण व पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच राखी ठाकरे यांनी सुध्दा विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले. लेझीम नृत्य दाखवून पाहुणे मंडळीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात अनेक गोंडी नृत्य, नाटीका, गीत मुला-मुलींनी सादर केले. संचालन आर.पी.राऊत व डी.डी.कारंजेकर यांनी केले.आभार सी.एच.बिसेन यांनी मानले.

Web Title: Girls should be self-reliant to protect themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.